Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Iran Inflation : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिलेली की, तुम्हाला पाषाण युगात पाठवीन. आता त्यापेक्षाही भयानक अवस्था इराणमध्ये आहे. तिथे एका अंड्याचा भाव सव्वालाख रुपये तर एक लिटर दूधासाठी 8 लाख मोजावे लागतायत.

Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
Iran economic crisis
| Updated on: Apr 11, 2026 | 8:55 AM

भारतात साधारण एका अंड्याचा भाव 8 ते 9 रुपये आहे. एक लिटर दूध 55 ते 56 रुपयांना मिळतं. पण जर तुम्ही किराणा सामानाच्या दुकानात गेलात तिथे दुकानदाराने एका अंड्याचा भाव सव्वा लाख रुपये सांगितला, एक लिटर दूधाची किंमत 8 लाख सांगितली. तर तुम्ही जागच्या जागी उडालं. तुम्ही त्या दुकानदाराला म्हणाले बाबा रे, तू हे काय लावलं आहेस. एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाखाला कोणी विकतं का?. पण एप्रिल 2026 मधील हे इराणमधील कडवं सत्य आहे. इराणमध्ये एक डझन अंड्याचा दर 15 लाख रियाल पर्यंत जाऊन पोहोचलाय. एक लिटर दूधाची किंमत 8 लाखापर्यंत आहे. एक किलो तांदळाचा भाव 32 लाख रियाल आहे. 1 किलो मटण एक कोटी रुपयांना मिळतय. एक डॉलर विकत घेण्यासाठी साडेसोळा लाख रियाल मोजावे लागत आहेत. इराण युद्ध जिंकल्याचा दावा करतोय. पण दुसऱ्याबाजूचं कडवं सत्य हे सुद्धा आहे.

आज इराणचं चलन म्हणजे फक्त एक कागदी तुकडा आहे. त्यापेक्षा त्याला जास्त महत्व उरलेलं नाही. अधिकृत आकडे आणि फ्रि मार्केटचं वास्तव यात जमीन-आसमानचं अंतर आहे. एप्रिल 2026 च्या सुरुवातीलाच एका अमेरिकी डॉलरची किंमत जवळपास 1,650,000 रियाल झालीय. भारतीय रुपयाशी तुलना केल्यास एक रुपयाचं मूल्य 17,200 इराणी रियाल होतात. इराणी चलनाचं मूल्य इतकं वेगाने घसरतय की, इराणच्या केंद्रीय बँकेने नुकतीच एक कोटी म्हणजे 10 मिलियन रियालची नोट जारी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत $7 डॉलरच्या आसपास आहे. आर्थिक एक्सपर्टसनुसार ज्यावेळी कुठल्या देशाच्या चलनात इतक्या वेगाने घसरण होते, तेव्हा ते फक्त पैशांचं नुकसान नसतं तर नागरिकांचं भविष्य देखील रसातळा जातं.

‘द आर्ट ऑफ सँक्शन्स’ मध्ये काय म्हटलय?

रिचर्ड नेफ्यू यांनी त्यांच्या ‘द आर्ट ऑफ सँक्शन्स’ या पुस्तकात लिहिलय की, फक्त अर्थव्यवस्थेचं नुकसान करणं एवढाच प्रतिबंधांचा उद्देश मर्यादीत नसतो, तर जनतेची मानसिक कणखरता मोडणं हा सुद्धा हेतू असतो. इराणमध्ये अमेरिका हाच खेळ खेळत आहे.

यावेळी त्यांच्या रडारवर फक्त तेल नाही

इराणने माघार घेतली नाही तर त्यांना स्टोन एज म्हणजे पाषाण युगात पाठवू अशी धमकीच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांनी इराणची वीज केंद्र आणि पुलांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी दिलेली डेडलाइन संपायला अवघा एक तास उरला असताना या युद्धात सीजफायरची घोषणा झाली. 2026 च्या सुरुवातीलाच ट्रम्प प्रशासनाने इराण विरुद्ध दबाव टाकण्याची खेळी सुरु केली. यावेळी त्यांच्या रडारवर फक्त तेल नव्हतं. इराणचा ड्रोन कार्यक्रम, मिसाइल सेक्टर आणि समुद्री शिपिंग नेटवर्क सुद्धा होतं.

Follow Us