AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, थेट इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल, काय घडतंय?

इराणचे डेलिगेशन आणि अमेरिकेचे प्रतिनिधिमंडळ युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दाखल झाले आहेत. आता दोन्ही देशांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, थेट इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल, काय घडतंय?
mohammad baqer kalibafImage Credit source: File Photo
| Updated on: Apr 11, 2026 | 7:30 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता युद्धविराम लागला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हे सीजफायर करण्यात आले आहे. या सीजफायरनंतर अनेक देशांना आनंद झाला आहे. आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. इराणच्या संसद अध्यक्ष मोहम्मद बाकेर कलीबाफ यांच्या नेतृत्वात एक इराणी प्रतिनिधिमंडळ अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी इस्लामाबादमध्ये पोहोचले आहे. हे संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण राजनैतिक पाऊल असल्याचे दिसते. इराणी माध्यमांनुसार, प्रतिनिधिमंडळाने स्पष्ट केले की, वॉशिंग्टनने तेहरानच्या अटी स्वीकारल्या तरच पुढील चर्चा होईल.

या प्रतिनिधिमंडळात इराणचे परराष्ट्र मंत्री, सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव, केंद्रीय बँकेचे गवर्नर आणि संसदेचे अनेक सदस्यांसह वरिष्ठ राजकीय, लष्करी आणि आर्थिक अधिकारी समाविष्ट आहेत. इस्लामाबादमध्ये झालेल्या या आगमनानंतर इराणी आणि अमेरिकी अधिकाऱ्यांमध्ये आमने-सामने चर्चा होणार आहे. पाकिस्तान या महत्त्वाच्या बैठकीचे यजमानपद अशा वेळी करत आहे जेव्हा युद्धविरामाची स्थिती अत्यंत नाजूक आहे आणि दोन्ही बाजूंमध्ये अविश्वास कायम आहे. तेहरानने वारंवार यावर जोर दिला आहे की, औपचारिक चर्चा सुरू होण्यापूर्वी काही ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, ज्यात प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक निर्बंधांशी संबंधित मुद्दे समाविष्ट आहेत.

प्रतिनिधिमंडळातील प्रमुख व्यक्ती:

-इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकेर कलीबाफ

-इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची

-सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली अकबर अहमदीन

-केंद्रीय बँकेचे गवर्नर अब्दोलनासेर हेम्मती

-माजी आयआरजीसी कमांडर मोहम्मद बाकेर जोलघाद्र

इराणी माध्यमांनुसार, इराणच्या संसदेचे अनेक सदस्य देखील या प्रतिनिधिमंडळात आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, एक इराणी प्रतिनिधिमंडळ शुक्रवारी चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे आणि सर्व पक्ष रचनात्मक चर्चा करतील अशी आशा व्यक्त केली. इराणी संसद अध्यक्ष मोहम्मद बाकेर कलीबाफ आणि विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, कोणत्याही युद्धविरामात लेबनानमधील हिजबुल्लाहवर इज्रायलने केलेल्या हल्ल्यांचा समावेश असावा आणि निर्बंधांमुळे जप्त केलेल्या इराणी मालमत्तेची मुक्तता देखील व्हावी. शनिवारी होणाऱ्या चर्चेत किती मागण्यापूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अमेरिकी डेलिगेशन रवाना

उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वात एक अमेरिकी प्रतिनिधिमंडळ, ज्यात विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांचा समावेश आहे, शुक्रवारी इराणशी चर्चेसाठी इस्लामाबादकडे रवाना झाले. दोन्ही बाजू एकमेकांवर तात्पुरत्या युद्धविरामाच्या वचनभंगाचा आरोप करत असल्या तरीही चर्चेसाठी ते रवाना झाले आहेत. व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चर्चेतून होर्मुज सामुद्रधुनी लवकर उघडण्याची शक्यता कमी आहे, तर इराणच्या मुख्य वार्ताकारांनी लेबनानबाबत आश्वासन आणि निर्बंधांमध्ये सूट मिळाल्याशिवाय चर्चा सुरू न होण्याचे स्पष्ट केले आहे.

व्हाइट हाउसला लवकर यशाची शंका

उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी शुक्रवारी रवाना होण्यापूर्वी सांगितले की, व्हाइट हाउसचे अधिकारी आगामी चर्चेबाबत सावध आहेत आणि वॉशिंग्टनने हात पुढे केल्यानंतरही अंतर्गत वातावरणात संशय आहे. इराण, स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्याबाबत अद्याप सतर्क आहे, कारण हे लोक अमेरिका आणि इज्रायलने बॉम्बहल्ले सुरू करण्यापूर्वी ओमानच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत सहभागी होते. त्या बॉम्बहल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ इराणी अधिकारी मारले गेले होते. व्हान्स यांच्याकडे परराष्ट्र धोरणाचा मर्यादित अनुभव आहे आणि त्यांनी परदेशातील अमेरिकी हस्तक्षेपांवर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत.

Follow Us
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
Vinayak Raut | सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह विभागाकडून...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
Abhijeet Dipke | परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंचा सरकारला थेट इशारा
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय