Iran-US Peace Talk : शांतता चर्चेत पाकिस्तान खूप पुढे पुढे करतोय पण भारताची भूमिका..अमेरिकन राजदूत गोर यांचं महत्वाचं वक्तव्य

Iran-US Peace Talk : "पुढच्या काही दिवसात तुम्हाला बातम्या कळतील. पण माहिती देण्याची ही योग्य वेळ नाहीय. याचा अर्थ असा आहे की व्यापार, द्विपक्षीय मुद्यांवर काही मोठ्या घोषणा होऊ शकतात"

Iran-US Peace Talk : शांतता चर्चेत पाकिस्तान खूप पुढे पुढे करतोय पण भारताची भूमिका..अमेरिकन राजदूत गोर यांचं महत्वाचं वक्तव्य
Trump-sergio gor
| Updated on: Apr 15, 2026 | 9:18 AM

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण शांतता चर्चा फेल झाली. त्यानंतर पुन्हा एकदा धमक्यांचा खेळ सुरु झाला आहे. आता अमेरिकेकडून हॉर्मुज स्ट्रेटची नाकेबंदी करण्यात आली आहे. काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र् मोदींना फोन केला. दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं. शांतता चर्चेत भारताच्या भूमिकेबद्दलही दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं झाल्याचं गोर म्हणाले. मध्य पूर्वेतील युद्ध संपवण्यासाठी भारत योगदान देणारं असेल तर अमेरिका स्वागतच करेल असं ते म्हणाले. भारताला काय करायचय हे त्यांना स्वत:ला ठरवावं लागेल असं सर्जियो गोर म्हणाले.

शांतता चर्चेत भारताची काय भूमिका असेल? या प्रश्नावर सर्जियो गोर म्हणाले की, “आम्ही ज्या प्रमाणे दुसऱ्या देशांच्या सहभागाचं स्वागत केलय तसं भारताच्या योगदानाचंही स्वागत करु. खरं सांगायचं झाल्यास हे भारताला ठरवायचय. मला वाटतं सगळ जगं शांतता वाटाघाटींमध्ये भूमिका बजावू शकतं. यात भारतही आहे”

या बद्दल माहिती देणं हे माझं काम नाहीय

“हा संघर्ष संपवण्यासाठी जे कोणी मदत करु शकतात, त्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प कोणासोबतही भेदभाव करत नाहीयत. ज्यांना या प्रक्रियेत सहभागी व्हायचय त्या प्रत्येकाचं राष्ट्रपती स्वागत करतायत” असं सर्जियो गोर म्हणाले. वॉशिंग्टनवरुन परतल्यानंतर गोर काही तासात हे सर्व बोलले. वॉशिंग्टनमध्ये त्यांनी सर्व कॅबिनेटची भेट घेतली. “पुढच्या काही दिवसात तुम्हाला बातम्या कळतील. पण माहिती देण्याची ही योग्य वेळ नाहीय. याचा अर्थ असा आहे की व्यापार, द्विपक्षीय मुद्यांवर काही मोठ्या घोषणा होऊ शकतात. पुढच्या काही दिवसात तुम्हाला या बद्दल समजेल. पण या बद्दल माहिती देणं हे माझं काम नाहीय” असं गोर यांनी सांगितलं.

मार्को रुबियो भारत दौऱ्यावर येणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याआधी पुढच्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प आणि पीएम मोदी यांच्या चर्चेत हॉर्मुज स्ट्रेटवर चर्चा झाली. पीएम मोदी यांनी एक्सवर पोस्ट करुन ही माहिती दिली.

 

Follow Us