पाकिस्तानची मध्यस्थी फळाला? असिम मुनीर यांच्या नावाची इतकी का चर्चा? ट्रम्प यांनी तर…

US Iran Deal News: व्हाईट हाऊसबाहेर गोळीबाराच्या घटनेपूर्वीच अमेरिका हादरलेली असतानाच जगासाठी एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. तर हा करार होण्यासाठी पाकिस्तानचे असिम मुनीर यांचे नाव ही चर्चेत आले आहे.

पाकिस्तानची मध्यस्थी फळाला? असिम मुनीर यांच्या नावाची इतकी का चर्चा? ट्रम्प यांनी तर...
पाकिस्तानची मध्यस्थी फळाला?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 24, 2026 | 10:04 AM

US Iran Deal News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला आश्चर्याचा धक्का दिला. इराणसोबत एक व्यापक करार जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या करारानंतर होर्मुज स्ट्रीट समुद्रधुनी उघडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ वर याविषयीची माहिती दिली. ‘कराराविषयीची सर्व मुद्दे जवळपास निकाली निघाले आहेत. केवळ काही मुद्यांवर चर्चा करणे बाकी आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जगाचा जीव भांड्यात पडला आहे. तर हा करार होण्यासाठी पाकिस्तानची मदत झाल्याचा आवर्जून उल्लेख ट्रम्प यांनी केला.

गोलमेज परिषदेत पाकिस्तानचा आवर्जून उल्लेख

ट्रम्प यांनी ट्रूथवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी इराणसोबतचा कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आखाती देशासह पाकिस्तानचाही उल्लेख केला आहे. “मी व्हाईट हाऊसच्या ओवल कार्यलयात आहे. इथे सौदी अरबचे प्रमुख मोहम्मद बिन सलमान अल सऊद, युनायटेड अरब अमिरातचे मोहम्मद बिन ज़ायद अल नाहयान, अमीर तमीम बिन हमद बिन खलीफ़ा अल थानी, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम बिन जाबेर अल थानी आणि मंत्री अली अल-थवाडी, पाकिस्तानचे फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर अहमद शाह, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला II आणि बहरीनचे राजे अहमद बिन ईसा अल खलीफ़ा यांच्यासह इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान आणि PEACE शी संबंधित मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिगवर चांगली आणि फलदायी चर्चा झाली.” असे ट्रम्प यांनी लिहिले आहे.

इस्त्रायलची काय भूमिका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणसोबतच्या करारावर आखाती देशासह इस्त्रायल सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. हा करार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यावर आता चर्चा पूर्ण झाली आहे. हा करार युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आणि इतर देशांमधील सहमतीवर आधारीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर आपण इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी सुद्धा याविषयावर चर्चा केली आहे. त्यांच्यासोबतची चर्चाही चांगली झाली. या कराराच्या अंतिम मसुद्यावर आता मंथन सुरू आहे. लवकरच या कराराची संयुक्त घोषणा करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर होर्मुज स्ट्रेट समुद्रधुनी लवकरच सुरू होईल असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

14 मुद्यांवर चर्चा

बैठकीत एकूण 14 मुद्यांवर चर्चा करण्यात आली. इराणने हे चौदा मुद्दे मांडले होते. अंतिम मुसदा हा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला देण्यात आला. असिम मुनीर आणि पंतप्रधान शरीफ यांनी त्यासाठी मेहनत घेतली.  पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेत मध्यस्थाची भूमिका निभावली. आता सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम मसुदा पुर्णत्वास आला लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल असे ट्रम्प म्हणाले.

Follow Us