अमेरिकेचे आखाती तळ आता सुरक्षित नाहीत,चर्चेदरम्यान खामेनेईचा गर्भित इशारा

इराणचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनेई यांनी मध्य पूर्वेतील अमेरिकन तळ आता सुरक्षित रहाणार नाहीत. त्यांनी अमेरिका आणि इस्रायल विरोधात युद्धाला इस्लामिक रेजिस्टन्सचा विजय म्हटले आहे.

अमेरिकेचे आखाती तळ आता सुरक्षित नाहीत,चर्चेदरम्यान खामेनेईचा गर्भित इशारा
mojtaba and trump
| Updated on: May 26, 2026 | 7:16 PM

इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनेई यांनी अमेरिका आणि आखाती देशासंदर्भात मोठे वक्त केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनेई यांनी आता आखाती देशातील अमेरिकेचे तळ सुरक्षित राहणार नाहीत. खामेनेई यांनी म्हटले आहे की आता अमेरिकेला मध्य पूर्वेत पहिल्या सारखी सुरक्षित जागा मिळणार नाही. इराण आणि अमेरिकेत तीन महिन्यांपासून संघर्ष सुरु असलेल्या संघर्ष संपवण्यासाठी बैठका आणि चर्चांचा सिलसिला सुरु असताना मोजताबा खामेनेई यांनी अशी धमकी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खामेनेई यांनी हा संदेश आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिखित स्वरुपात जारी केला आहे. त्यांनी अमेरिका आणि इस्राईलच्या विरोधात सुरु असलेल्या युद्धाला इस्लामिक रेजिस्टेन्सचा विजय असे म्हटले आहे. ते म्हणाले इस्रायल त्याच्या वाईट अंताच्या शेवटाला पोहचला आहे. खामेनेई यांनी म्हटले की अमेरिका मुर्दाबाद आणि इस्रायल मुर्दाबाद हा इस्लामी जगताचा नारा कायम राहिल. त्यांनी मुस्लीम देशांना एकत्र येण्याचे आवाहनही केले. खामेनेई यांनी इराणी हज यात्रेकरूंना सांगितले की त्यांना जगभरातील मुसलमानांपर्यंत इराणच्या विजयाचा संदेश पोहचवावा.

दोहात सुरु आहे युएस-इराण चर्चा

खामेनेई यांनी म्हटले की इस्लामिक देशांना मिळून एक नवा क्षेत्रीय ढाचा तयार करायला हवा. त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा इराणचे अधिकारी कतारची राजधानी दोहा येथे अमेरिकेसोबत चर्चा करत आहेत. दोन्ही देश युद्ध समाप्त करण्यासाठी सामंजस्य कराराचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अमेरिका आणि इराण दोन्ही देशांनी म्हटले आहे की आता नजिकच्या काळात कोणत्याही मोठ्या कराराची आशा नाही.

५६ वर्षांचे मोजताबा खामेनेई यांनी ८ मार्च रोजी इराणचे सर्वोच्च नेते बनवले गेले होते. त्यानंतर ते सार्वजनिक रुपात नजरेस आले नाही. ते केवळ लिखित निवेदन सादर करत असतात. अलिकडच्या हल्ल्यात ते जखमी झाल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.

अमेरिकेचे दक्षिण इराणवर हल्ले

खामेनेई यांच्या वक्तव्याच्या काही तास आधी अमेरिकन सैन्याने दक्षिण इराणमध्ये मिसाईल तळांवर आणि समुद्रात सुरुंग लावण्याच्या प्रयत्न करत असलेल्या नौकांवर हल्ला केला होता. अमेरिकेने म्हटले आहे की ही कारवाई क्षेत्रीया सुरक्षा कायम ठेवण्यासाठी केली आहे.

दोन्ही देशात ८ एप्रिल पासून संघर्ष बंदी लागू आहे. परंतू अलिकडील हल्ल्यानंतर हा सीजफायर कमजोर होताना दिसत आहे. युद्धा दरम्यान मध्य पूर्वेतील अनेक अमेरिकन तळांवर इराण पुरस्कृत हल्लेही झाले होते.

Follow Us