
अमेरिका आणि इराण युद्धाला 1 महिना पूर्ण झाला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. उलट युद्ध अधिक घातक होत आहे. अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा 6 एप्रिलपर्यंत करण्यात आली पण ती इराणला मान्य नाही. इराणकडून युद्ध थांबवण्याकरिता काही अटी ठेवण्यात आल्या. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने अनेक देश संकटात आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडत असून आता अमेरिकेने सुरक्षेत मोठी वाढ केली. नुकताच मिळलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने त्यांच्या भागात 3500 जास्त सैनिक तैनात केले आहेत. यूएस सेंट्रल कमांडने (CENTCOM) पुष्टी केली आहे की, आधुनिक युद्धनौका यूएसएस त्रिपोली सुमारे 2,500 मरीन सैनिकांना घेऊन तिच्या निर्धारित कार्यक्षेत्रात दाखल झाली आहे.
अमेरिकेची ही युद्धनाैका F-35 स्टील्थ फायटर जेट आणि ओस्प्रे असलेली अत्यंत आधुनिक आहे. यूएस सेंट्रल कमांडच्या म्हणण्यांनुसार, 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत आतापर्यंत 11,000 हून अधिक टार्गेटवर हल्ला केला. आता यावरून स्पष्ट होते की, अमेरिकेकडून कोणत्या स्तरावर तयारी सुरू आहे. यादरम्यानच इराणकडून अमेरिकेला धक्का देत साैदीच्य प्रिंस सुलतान एअरबेसवर मोठा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक जखमी झाले. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्काे रूबियो यांनी थेटपणे म्हटले की, आमचे सैनिक जमिनीवर उतरूनही आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतात. अमेरिकेने जरी युद्धबंदी 6 एप्रिलपर्यंत जाहीर केली असली तरीही इराणकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, आम्हाला अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. त्यांना जर युद्धबंदी हवी असेल तर त्यांनी आम्ही दिलेल्या 6 अटी मान्य कराव्यात.
इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धात माघार घेण्यास तयार नाही. या युद्धाच्या झळा जगाला बसत आहेत. इराणकडून थेट अमेरिला युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्यात आली. नाटो देश अमेरिकेच्या मदतीला येत नसल्याने अमेरिकेकडून संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच ब्रिटनवरही गंभीर आरोप यापूर्वीच अमेरिकेने केले आहेत. सध्या अमेरिकेकडून मोठी तयारी सुरू आहे.