
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर २५ ट्रक्के आयात शुल्क (टॅरिफ ) लावले आणि त्यानंतर रशियातून इंधन खरेदी केल्याचा दंड म्हणून आणखीन २५ टक्के शुल्क लावले. त्यामुळे भारत अमेरिकेने सर्वाधिक टॅरिफ लावलेल्या देशात समाविष्ठ झाला आहे. ब्राझील आणि भारताची एकसारखी अवस्था आहे. हे कमी होते की काय आणि ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढ केली. त्यामुळे ट्रम्प यांच्या मनात भारताबद्दल इतका राग का आहे ? याचे सर्वांना कोडे पडले आहे. या वेळी अमेरिकेचा हा निर्णय त्यांच्या पायावर कुऱ्हाड तर ठरणार नाही ना असा एक प्रवाद आहे. डोनाल्ड ट्रम्प एक प्रकारे भारतीयांचे मास डिपोर्टेशन करत आहेत. तसेच हा ही प्रयत्न करीत आहे की इतर देशांचे नागरिक अमेरिकेत कमीत कमी यावेत. परंतू भारतीयावर त्यांची जरा जास्तच सक्ती सुरु आहे. वर्क व्हिसाची फि वाढ असो की युनिव्हर्सिटीतील नियम बदलणे असो त्यांची अरेरावी वाढत आहे....