
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि आमच्या सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प हे भारतावर नाराज आहेत. आता नुकताच एक अत्यंत मोठी माहिती पुढे आलीये. अमेरिकेने 2025 मध्ये म्हणजेच या 7 महिन्यांत आतापर्यंत तब्बल एकूण 1, 703 भारतीय नागरिकांना देशातून बाहेर काढले आहे. यामध्ये 141 महिलांचा देखील समावेश आहे. या आकडा अत्यंत मोठा मानला जातोय. विदेश राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी ही माहिती लोकसभेत दिलीये.
अमेरिकेतून तब्बल काढले इतक्या भारतीय लोकांना
किर्ती वर्धन सिंह म्हणाले की, 2020 ते 2024 दरम्यान 5, 541 भारतीयांना अमेरिकेतून भारतात परत पाठवण्यात आले. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. अमेरिकेच्या नाराजीचे प्रमुख कारण म्हणजे रशिया आहे. भारत मागील काही वर्षांपासून रशियाकडून कच्चे तेल स्वस्त भावात खरेदी करतोय आणि हीच गोष्ट ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपसत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवली मनातील खदखद
फक्त हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा कर लादणार असल्याचे स्पष्ट केले. भारत सर्वाधिक कर लादणारा देश असल्याचेही त्यांनी म्हटले. भारत फक्त आमच्याकडून काहीच खरेदी करत नाही आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला विकतो असेही त्यांनी म्हटले होते. त्यामध्येच आता भारतीय लोकांना अमेरिकेतून परत भारतात मोठ्या संख्येने पाठवले जात असल्याचे आता आकडेवारीवरून स्पष्ट होताना दिसत आहे.
रशियाकडून कच्चे तेल स्वस्त भावात खरेदी करत असल्यानो पोटदुखी
या वर्षी 2025 मध्ये 22 जुलैपर्यंत अमेरिकेतून हद्दपार झालेल्या भारतीयांची संख्या 1,703 आहे. गेल्या पाच वर्षांत ब्रिटनमधून 311 भारतीयांना हद्दपार करण्यात आले, तर 2o25 मध्ये ही संख्या आतापर्यंत 131 आहे. रिपोर्टनुसार, ब्रिटनमधून भारतीयांना काढण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. बऱ्याचदा कागदपत्रांमुळेही काढले जाते. मात्र, अमेरिकेतून भारतीयांना काढण्याची संख्या वाढल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेकडून भारताच्या विरोधात कठोर पाऊले उचलली जात आहेत. आठवड्याभरात कराबाबत निर्णय होईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना सांगितले होते.