जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जाहिरात, थेट या देशावर अमेरिकेने लावला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ, मोठी..

America Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत धक्कादायक निर्णय घेत त्यांच्या विरोधात जाहिरात केल्याने तब्बल 10 टक्के टॅरिफ लावला.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जाहिरात, थेट या देशावर अमेरिकेने लावला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ, मोठी..
Donald Trump Canada Tariffs
| Updated on: Oct 26, 2025 | 10:02 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या धमक्या सातत्याने देताना दिसत आहेत. फक्त धमक्याच नाही तर मोठा टॅरिफही त्यांनी अनेक देशांवर लावला. कॅनडावर आता नुकताच अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लावण्याचा त्यांनी धक्कादायक निर्णय घेतला. आता कॅनडावर एकून 45 टक्के टॅरिफ लावण्यात आला. कॅनडावर 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचे कारण फक्त एक जाहिरात ठरलीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील जाहिरातीनंतर त्यांनी थेट 10 अतिरिक्त टॅरिफ लावला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय कॅनडाच्या ओंटारियो प्रांताने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनंतर घेतला.

एक जाहिरात आणि थेट 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ 

या जाहिरातीत माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन आयकॉन रोनाल्ड रेगन यांची व्हिडिओ क्लिप होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते, टॅरिफमुळे व्यापार युद्धे आणि आर्थिक संकट निर्माण होत आहे. या व्हिडीओ जाहिरातीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इतका जळफळाट उठला की, त्यांनी थेट हे खोटे आणि दिशाभूल करणारे म्हटले. यासोबतच त्यांनी या दाव्यानंतर थेट 10 टक्के टॅरिफ लावला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बोलणे या देशाला पडले महागात 

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांच्या तथ्यात्मक बनावटी आणि शत्रुत्वाच्या कृतींमुळे, मी कॅनडावरील कर सध्याच्या टॅरिफवर 10 टक्के वाढवत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी शुक्रवारी सांगितले की, ते अमेरिकेसोबत व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्यास तयार आहेत. मात्र, त्यानंतर आता अमेरिकेने धक्कादायक निर्णय घेत थेट 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर खळबळ 

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर कॅनडा आणि अमेरिकेतील संबंध अधिकच तणावात आल्याचे बघायला मिळतंय. दोन्ही देशाती व्यापार चर्चा देखील बंद आहे. डोनाल्ड ट्रम्प विविध कारणे देत अनेक देशांवर टॅरिफ लावताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला देखील मोठी धमकी दिली असून टॅरिफची लटकती तलवार अजूनही भारतावर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच चीनवरही 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.