अमेरिकेमुळे भारतातील शेतकरी अडचणीत, टॅरिफपेक्षाही मोठा झटका, तो एक करार होताच शेतकऱ्यांचे नुकसान…
India America Agreement : टॅरिफच्या मुद्द्यामध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात आहेत. त्यामध्येच आता अमेरिका भारतीय शेतकऱ्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भारत आणि अमेरिकेत एक करार होणार आहे.

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिकेतील संबंध मागील काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यामध्येच दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा देखील बंद असल्याचे सांगितले जातंय. आता भारत आणि अमेरिका करार लवकरच होणार असल्याची माहिती मिळतंय. या करारामुळे अमेरिकेच्या अटकळींनाही चालना मिळत आहे. या करारातून अमेरिका भारतात मक्का आयात वाढवेल. मात्र, या करारामुळे भारतीय शेतकरी त्रस्त असल्याचे बघायला मिळतंय. जर अमेरिकेचा मक्का भारतीय बाजारपेठेत मोठ्या संख्येने दाखल झाला तर त्याचा थेट फटका भारतीय मक्क्याला बसेल. अमेरिकेसोबत भारताने हा करार करू नये, अशी मागणी केली जात आहे. हा करार करण्यासाठी अमेरिकेचा भारतावर दबाव आहे.
भारतातील शेतकऱ्यांना चिंता आहे की, हा करार झाला तर शेतकऱ्यांना नफा दूरची गोष्ट आहे, साधा मक्याचा खर्च देखील निघणार नाही. या चिंतेमुळे मक्याची किंमत किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी झाली आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकेचा मक्का भारतीय बाजारपेठेत येण्यास सुरूवात झाली तर मक्क्याच्या किंमतींमध्ये मोठी घट होईल आणि त्याचा थेट परिणाम येथील शेतकऱ्यांवर होईल. अमेरिका जगातील सुमारे 35 टक्के मक्क्याचे उत्पादन करते.
भारत जगात मक्क्याचे उत्पादन 3 टक्के करतो. मागील काही दिवसांपासून मक्का भारतामध्ये आयात करण्यासाठी अमेरिका आग्रही होती. मात्र, भारतीय शेतकऱ्यांसाठी हा करार करणे भारत टाळत होता. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये भारत आणि अमेरिकेत हा करार होईल, असे काही रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आलंय. हा भारतीय शेतकऱ्यांना मोठा झटका म्हणावा लागेल. भारतावर अमेरिकेने अगोदर 50 टक्के टॅरिफ लावला.
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमधून मार्ग भारताकडून काढला जातोय. काही क्षेत्रांमध्ये मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता भारतात अमेरिका मक्का आयात करणार आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे 70 टक्के निर्यात कमी झालीये. या टॅरिफमधून मार्ग काढण्यासाठी भारताकडून प्रयत्न केली जात आहेत. टॅरिफच्या मुद्द्यामुळे भारत-अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगलेच संबंध सध्या तणावात असल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच मक्क्यासाठी अमेरिका आग्रही आहे.
