AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा भारतासाठी फतवा… विद्यार्थ्यांना अमेरिकेतून हाकलून देण्याची धमकी; काय परिणाम होणार?

टॅरिफचा मुद्दा असो किंवा H-1B व्हिसाचा मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आला असून आता अमेरिकेच्या निशाण्यावर थेट भारतीय विद्यार्थी आहेत.

अमेरिकेचा भारतासाठी फतवा... विद्यार्थ्यांना अमेरिकेतून हाकलून देण्याची धमकी; काय परिणाम होणार?
US Visa American Embassy india
| Updated on: Jan 09, 2026 | 10:54 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यासोबतच व्हिसाच्या नियमात मोठे बदल केले असून प्रचंड निर्बंध लादले आहेत. H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला असून 88 लाख रूपये शुल्क व्हिसावर लावण्यात आले. अमेरिकेमध्ये H-1B व्हिसावर सर्वाधिक भारतीय लोक जाऊन नोकऱ्या करतात. त्यांना हा थेट फटकाच आहे. फक्त हेच नाही तर H-1B व्हिसावर जाणाऱ्या व्यक्तीला आपले सोशल प्रोफाईल ओपन ठेवावे लागेल. अमेरिकन दूतावास अधिकारी प्रोफाईल चेक करणार आहेत. सध्याच्या बदललेल्या प्रक्रियेमुळे H-1B व्हिसावर अमेरिकेत जाण्यास उशीर होत आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्हिसाचे नियम अधिक कडक केली जात आहेत. यासोबतच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सध्या अमेरिकेच्या बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुढील काही काळात नियमांमध्ये बदल होऊ शकतात आणि अमेरिकेत येण्यास त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेत जे लोक व्हिसावर राहतात, त्यांनीही काही नियमांचे पालक करावे लागणार आणि नाही तर बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नुकताच आता अमेरिकेच्या सरकारने भारतीय विद्यार्थ्यांना मोठा इशारा दिला असून थेट बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचेही म्हटले आहे.

भारत आणि अमेरिकेतली सध्याच्या तणावाचे पडसाद थेट विद्यार्थ्यांवर होताना दिसत आहेत. भारतातील अमेरिकन दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना मोठा इशारा दिला. अमेरिकन कायद्याचे उल्लंघन केल्यास तुमचा विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो, असेही सांगण्यात आले. तुमचा व्हिसा रद्द करून तुम्हाला अमेरिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.

अमेरिकेने व्हिसा रद्द केल्यावर नक्कीच काय होणार परिणाम- 

अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केला तर विद्यार्थ्याचे शैक्षणिक मोठे नुकसान होईल.

हेच नाही तर विद्यार्थ्याला आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागेल.

यासोबतच भविष्यात अमेरिकेत जाण्याची खूप कमी संधी विद्यार्थ्याकडे असणार आहे.

अमेरिकेला याचा थेट मोठा फटका बसून शकतो, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो.

आयटी क्षेत्र, अंतराळ क्षेत्र आणि संशोधनाच्या क्षेत्रात मोठं नुकसान होईल.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले.
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका.
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला.
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान.
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात.
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप.
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.