AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी गुडन्यूज, या देशावरील तब्बल इतके टक्के टॅरिफ कमी, भारतालाही अखेर…

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा काही क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला असून मोठे नुकसान होताना दिसतंय. आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आल्याचे बघायला मिळतंय. टॅरिफमुळे होणारे नुकसान कमी होण्याचे मोठे संकेत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी गुडन्यूज, या देशावरील तब्बल इतके टक्के टॅरिफ कमी, भारतालाही अखेर...
US tariff Donald Trump
| Updated on: Oct 30, 2025 | 12:05 PM
Share

टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. आता अमेरिकेची भारताबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. यामधून मार्ग काढण्यासाठी भारताने प्रयत्न केला. मात्र, टॅरिफ अखेर अमेरिकेने लावला. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेत होणारी 70 टटक्के निर्यात कमी झाली. चीनवर देखील 100 टक्के टॅरिफ लावण्याची मोठी घोषणा अमेरिकेने केली. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर 100 टक्के टॅरिफ लागणार असतानाच अमेरिकेने मोठा दिलासा चीनला दिलाय. रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणाऱ्या चीनवर अमेरिकेने मेहरबानी दाखवली. चीनवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला.

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले. चीनच्या तुलनेत भारत रशियाकडून रकमीच तेल खरेदी करतो. जगात सर्वात जास्त चीन हा देश रशियाकडून तेल खरेदी करतो. यामुळे आता भारतावरील टॅरिफ कमी होण्याचे मोठे संकेत आहेत. यासोबतच भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असल्याचे स्वत:अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प आणि सी जिनपिंग यांच्यातील बैठकीचा फायदा चीनला झाल्याचे स्पष्ट होतंय. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, चीनवरील 10 टक्के टॅरिफ कमी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय. बुसानमध्ये सी यांच्याशी दोन तासांहून अधिक काळ झालेल्या बैठकीनंतर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आमच्या बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर मार्ग निघाली आहेत.

आमच्यात सर्व गोष्टींवर चर्चा झाली. ती खरोखऱच एक चांगली बैठक नक्कीच होती. सोयाबीन खरेदी लवकरच सुरू होईल, चीनवरील टॅरिफ 57 टक्क्यांहून 47 टक्क्यांपर्यंत कमी होईल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आहे तो टॅरिफ चीनवरील कमी होईल. मात्र, 1 तारखेपासून सुरू होणाऱ्या टॅरिफबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरीही त्यांनी आहे त्यापैकी 10 टक्के टॅरिफ कमी करणार असल्याचे म्हटले. यामुळे 100 टक्के टॅरिफ चीनवर लादला जाणार नसल्याचे यावरून स्पष्ट होतंय. अमेरिकेने मोठी मेहरबानी चीनवर दाखवली असून भारताच्या टॅरिफबद्दलही मार्ग निघण्याचे मोठे संकेत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...