टॅरिफचे संकट संपणार? अमेरिकेतून भारतासाठी आनंदाची बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संकेत, थेट व्यापार करार…
टॅरिफच्या मुद्द्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा जवळपास बंद असल्याचे बघायला मिळाले. आता मोठे संकेत थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आलीत.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आहेत. हेच नाही तर व्यापार चर्चा देखील बंद होती. आता दोन्ही देशांमधील वाद मिटण्याचे संकेत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः यावर भाष्य करत मोठे संकेत दिली आहेत. आशिया दाैऱ्यावर सध्या ट्रम्प असून दक्षिण कोरियातील ग्योंगजू येथे झालेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य सीईओ शिखर परिषदेत त्यांनी भारतासोबत सुरू असलेल्या व्यापार मुद्द्यावर विधान केले आणि भारतासोबत व्यापार करारावर काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. यादरम्यान बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आदरही व्यक्त केला.
टॅरिफच्या मुद्द्यामध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात असताना आता दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची आशा आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, मी भारतासोबत व्यापार करार करत आहे… यादरम्यान त्यांनी म्हटले की, भारत पाकिस्तान संघर्षावरही भाष्य केले. भारतासोबत पुन्हा एकदा चांगले संबंध प्रस्तापित करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, दुसरीकडे रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता दबाव देखील टाकला जातोय.
द्विपक्षीय व्यापार करारावर भारतीय आणि अमेरिकन अधिकाऱ्यांमधील चर्चा पुन्हा एकदा प्रगतीपथावर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर भारताकडून व्यापार करारासंदर्भात म्हणावा तसा प्रतिसाद अमेरिकेला दिला जात नव्हता. मात्र, व्यापार करार पूर्ण करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात असून ट्रम्प स्वत: यामध्ये लक्ष घालत आहेत. सध्याच्या घडामोडींनुसार, अमेरिका भारतावर लावलेला अतिरिक्त टॅरिफ काढण्याच्या तयारीत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यादरम्यान आर्थिक सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षा आहे, असेही म्हटले. जगभरात आपण एकामागून एक व्यापार करार करत आहोत, असेही त्यांनी म्हटले. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, आम्ही त्यांच्यावरील अतिरिक्त टॅरिफ काढू. रशिया आणि युक्रेन युद्ध भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने इतके दिवस सुरू असल्याचा आरोप अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारतावर केला होता.
