US-India Trade Deal: एक फोन आणि सूत्रं फिरली, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चेनंतर घटले टॅरिफ, रात्रीतूनच बदलल्या या 5 गोष्टी

US India Trade Deal : भारत आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून व्यापारी तणावच नाही तर राजकीय तणावही वाढला होता.डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारासमोर भारताने मोठे आव्हान उभं केलं होतं. अखेर ट्रम्प यांना नमतं घ्यावं लागलं आणि टॅरिफ कमी झाला. रात्रीतून घडलं काय?

US-India Trade Deal: एक फोन आणि सूत्रं फिरली, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चेनंतर घटले टॅरिफ, रात्रीतूनच बदलल्या या 5 गोष्टी
भारत-अमेरिका व्यापारी करार
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 03, 2026 | 8:50 AM

Donald Trump-Narendra Modi: अनेक महिन्यापासून भारत आणि अमेरिकेत व्यापारी तणाव वाढला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारासमोर भारतानं मोठं आव्हान उभं केलं. ब्रिक्स देशात भारताची सक्रियता वाढली. भारताने सार्वभौमत्वाशी तडजोड केली नाही. अखेर सर्व डावपेच फेल गेल्यावर डोनाल्ड ट्रम्प वठणीवर आले. अमेरिका आणि भारतात गेल्या काही दिवसांपासून लांबलेला व्यापारी करार सोमवारी रात्री निश्चित झाला. या कराराची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून केली.

ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावना मांडल्या. त्यानुसार, आज सकाळी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी माझी चर्चा झाली, हा माझ्यासाठी मोठ्या आनंदाचा क्षण आहे. माझ्या चांगल्या मित्रांपैकी ते एक आहेत. ते एक सन्मानिय आणि शक्तिशाली नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मैत्री, आदर आणि त्यांच्या विनंतीवरून आम्ही लागलीच प्रभावाने अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी कराराला मंजूरी दिली. त्यातंर्गत टॅरिफ 25 टक्क्यांहून घटवत 18 टक्के करण्यात आले आहे.

अमेरिका टॅरिफ 18% वर

ट्रम्प यांनी सांगितले की दोन्ही देशात चर्चा झाली. त्यानंतर भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील रेसिप्रोकल टॅरिफ 25% टक्क्यांहून 18% वर आणण्यात आले. यापूर्वी अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्यात आले होते. तर अतिरिक्त टॅरिफ लावत अमेरिकेने भारतासोबतचे संबंध ताणल्याचे अधोरेखित केले होते. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणल्या गेले होते.

रशियाकडून तेल खरेदीवरील अतिरिक्त शुल्क हटवले

या करारातंर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेले अतिरिक्त 25% टॅरि हटवले. भारताने रशियाकडून इंधन खरेदी सुरूच ठेवल्याने हा टॅरिफ लावण्यात आला होता. अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्याने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार अतिरिक्त शुल्क तेव्हाच हटवण्यात आले, जेव्हा भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्यास अनुकूलता दर्शवली. दरम्यान यावरून पुन्हा वाद होत आहे.

टॅरिफ घेतले परत

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा मनमानी कारभार समोर आला होता. अमेरिकेने ऑगस्ट 2025 मध्ये भारतावर टॅरिफ बॉम्ब फोडला होता. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत कर वाढवला. भारताला टॅरिफमध्ये भरडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे कपडे, रसायनं, वाहनांचे सुट्टे भाग, इतर वस्तूंच्या किंमती भडक्या आणि व्यापारावर मोठा परिणाम झाला.

त्यानंतर रात्री ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफ तर अगोदर हटवलेच. तर आता रेसिप्रोकल टॅरिफ 25% टक्क्यांहून 18% वर आणला. भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलरच्या वस्तू खरेदी करेल. यात ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर वस्तू खरेदी करेल. तर भारतावरील शुल्क आणि इतर टॅरिफ हळूहळू अगदी शून्य करण्यात येतील असे आश्वासनही ट्रम्प यांनी दिले.