भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा इशारा, थेट निर्बंधच..

इराण आणि अमेरिका युद्धात जगाला मोठा धक्का बसला. जग युद्धात होरपळले जात आहे. त्यामध्येच आता अत्यंत मोठा इशारा अमेरिकेने दिला. ज्यामुळे होर्मुज खाडीत अधिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेने दिलेल्या या इशाऱ्याचा परिणाम थेट भारतावरही होऊ शकतो.

भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा इशारा, थेट निर्बंधच..
India America
| Updated on: May 03, 2026 | 10:46 AM

इराण आणि अमेरिका युद्धात जग मोठ्या संकटात आहे. त्यामध्येच होर्मुज खाडीत संकट आहे. अमेरिकेने इराणभोवती मोठी नाकेबंदी केली. या नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाही. अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर स्थिती अधिक गंभीर आहे. त्यामध्ये अमेरिकेने मोठा लष्कर हल्ला इराणवर करण्याचे संकेत दिले. इराणकडून नवा प्रस्ताव अमेरिकेला देण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव अमेरिकेला मान्य नाही. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी इराणला दिली. अमेरिकेने आता इराणला अत्यंत मोठा इशारा दिला. अमेरिकेने स्पष्टपणे इशारा देत म्हटले की, सुरक्षित मार्गासाठी इराणला पैसे देणाऱ्या जहाज वाहतूक कंपन्यांवर निर्बंध लादले जाऊ शकतात. म्हणजेच थोडक्यात काय तर होर्मुज खाडी पार करण्यासाठी ज्या कोणत्या तेल कंपन्या पैसे देत आहेत, त्याच कंपन्या आता इराणच्या निशाण्यावर आल्या आहेत.

अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर जागतिक व्यापार आणि तेल बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण होर्मुज खाडी अत्यंत महत्वाची आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. पाकिस्तान, बांगलादेश, चीन, भारत या सारख्या देशांमध्ये मोठे ऊर्जेचे संकट आहे.

ज्यामुळे होर्मुज खाडीत इराणला पैसे देऊन जहाज काढली जात आहेत. मात्र, अमेरिकेने आता इशारा देत म्हटले की, जर इराणला होर्मुज खाडीतील सुरक्षित मार्गासाठी पैसे दिले तर मोठी कारवाई केली जाईल. अमेरिकेच्या या इशाऱ्यामुळे अनेक देश संकटात आले. ज्यापैकी भारत देखील एक आहे. आता होर्मुज खाडीतून जहाज जरी सुरक्षित निघाले तरी अमेरिका कारवाई करणार.

मुळात म्हणजे इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यापुरते हे युद्ध मर्यादित राहिले नाही. या युद्धाचा सर्वांनाच मोठा फटका बसताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जग होरपळत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याने समस्या कमी होण्यापेक्षा समस्या अधिक वाढण्याचे संकेत आहेत. अमेरिका थेट निर्बंध लादू शकते.

Follow Us