AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा

Iran Oil Exports : अलिकडेच स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांमध्ये पहिल्या फेरीतील चर्चा पार पडली, यावेळी अमेरिका आणि इराण यांच्यात अनेक मुद्द्यांवर प्राथमिक सहमती झाली आहे.

अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा
Iran india oil exportImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 23, 2026 | 4:23 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जगातील अनेक देशाची झोप उडालेली आहे. अशातच अलिकडेच स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांमध्ये पहिल्या फेरीतील चर्चा पार पडली, यावेळी अमेरिका आणि इराण यांच्यात अनेक मुद्द्यांवर प्राथमिक सहमती झाली आहे. यामध्ये इराणला तेल विक्रीसाठी 60 दिवसांची सवलत देण्यात आली आहे. हा निर्णय जागतिक ऊर्जा बाजारासोबतच भारतासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आपल्या गरजांसाठी पूर्वी इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत होता. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांनंतर त्यात मोठी घट झाली होती. आता इराणला तेल निर्यातीची सवलत मिळाल्याने भारताला मोठा फायदा होऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

60 दिवसांसाठी बंदी उठवली

समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या 60 दिवसांच्या सामंजस्य करारानुसार इराणला तेल निर्यातीची सवलत देण्यात आली आहे. या बदल्यात इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीत अडथळा आणणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता 21 ऑगस्टपर्यंत इराणला कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची विक्री करता येणार आहे. काही तासांपूर्वीच अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी स्वित्झर्लंडमधील चर्चा सकारात्मक म्हटले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेझरी विभागाकडून परवाना जारी

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने इराण जनरल लायसन्स X जारी केले आहे. या परवान्याअंतर्गत 21 ऑगस्टपर्यंत इराणमधून निर्यात होणारे कच्चे तेल, पेट्रोकेमिकल उत्पादने आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या उत्पादन, वितरण आणि विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. या परवान्यानुसार, इराणी मूळ असलेल्या कच्च्या तेलाच्या, पेट्रोकेमिकल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या उत्पादन, विक्री, वितरण किंवा उतराईशी संबंधित सर्व व्यवहार, जे यापूर्वी अमेरिकन निर्बंधांच्या कक्षेत होते, ते आता 21 ऑगस्टपर्यंत शिथिल राहतील.

भारतासाठी ही सवलत का महत्त्वाची?

आकडेवारीनुसार, भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे इराणला मिळालेली ही सवलत भारतासाठीही महत्त्वाची आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला होता आणि त्याचा फटका भारतालाही बसला होता. आता अमेरिकेने इराणला दिलेल्या 60 दिवसांच्या सवलतीमुळे जागतिक तेलपुरवठा सुधारण्याची आणि तेलाच्या किमती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतालाही त्याचा थेट लाभ होऊ शकतो.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?