AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिकेचे B-2 बॉम्बर गायब, यामागे इराणचा हात? वाचा…

ऑपरेशन मिडनाईट हॅमरदरम्यान, एक अमेरिकन बॉम्बर ( लढाऊ विमान) बेपत्ता झाले आहे. अमेरिकेचे हे बॉम्बर इराणवर बॉम्ब टाकण्यासाठी निघाले होते, मात्र ते अद्याप परतलेले नाही.

मोठी बातमी! अमेरिकेचे B-2 बॉम्बर गायब, यामागे इराणचा हात? वाचा...
iran us
| Updated on: Jul 01, 2025 | 9:58 PM
Share

इराण-इस्रायल युद्ध सुरु असताना अमेरिकेने इराणवर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला होती. इराणच्या अनुप्रकल्पांवर हा हल्ला झाला होता. या मिशनला ऑपरेशन मिडनाईट हॅमर असे नाव देण्यात आले होते. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑपरेशन मिडनाईट हॅमरदरम्यान, एक अमेरिकन बॉम्बर ( लढाऊ विमान) बेपत्ता झाले आहे. अमेरिकेचे हे बॉम्बर इराणवर बॉम्ब टाकण्यासाठी निघाले होते, मात्र ते अद्याप परतलेले नाही. इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे बॉम्बर पाडले तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एका विमानतळावर हा अमेरिकन बॉम्बर दिसला आहे, त्यामुळे असंही बोललं जात आहे की हे विमान सुरक्षित आहे. मात्र खरी परिस्थिती काय आहे ते कोणालाही माहिती नाही. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की बी-2 बॉम्बर बेपत्ता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या गुप्त मिशनमुळे देशाला मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

एका अहवालानुसार, ऑपरेशन मिडनाईट हॅमरसाठी निघालेले बी-2 बॉम्बर अद्याप अमेरिकन तळावर परतलेले नाही. या अहवालात असे म्हटले आहे की, ‘इराणवर हल्ला करण्यासाठी दोन गट तयार करण्यात आले होते, एका गटाचे काम इराणला फसवणे होते आणि दुसऱ्याचे काम इराणवर हल्ला करणे होते. मात्र आता या दोन बॉम्बर्सच्या गटांपैकी एक परतलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.

स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे बी-2 बॉम्बर्सला ट्रॅक करणे खूप कठीण आहे. त्यामुळे अशा विमानांना एअर डिफेन्स सिस्टीमने पाडता येत नाही. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की बॉम्बर्स कुठे गेले? तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बी-2 बॉम्बर्सचा रेडिओ बंद असू शकतो, त्यामुळे त्याचे स्थान समजू शकत नाही. तसेच काहींनी असा संशय व्यक्त केला आहे की, अमेरिकेने एखाद्या गुप्त ठिकाणी हे बॉम्बर तैनात केलेले असू शकते.

अमेरिकेने काय म्हटले?

अमेरिकेने या अहवालावर भाष्य करणे टाळले आहे. मात्र या बी-2 बॉम्बर बाबत एक फोटो आणि एक बातमी समोर आली आहे. माजी पायलट डेव्हिड मार्टिनने होनोलुलु येथील बी-2 बॉम्बर्सचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात बी-2 बॉम्बर टॅक्सीवेला बांधलेले दिसत आहे. त्यामुळे असेही बोलले जात आहे की, या अमेरिकन बॉम्बरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. मात्र ही माहितीही अधिकृत नाही. त्यामुळे हे बॉम्बर नेमकं कुठं आहे याबाबत माहिती समजू शकलेली नाही.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.