भारताच्या विरोधात अमेरिकेने धरणे थेट चीनला हाताशी, डोनाल्ड ट्रम्प शी जिनपिंग यांच्यात फोनवर दीर्घ संवाद, चीनने..

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनवरही मोठा टॅरिफ लावणार असल्याचे म्हटले. मात्र, त्यानंतर त्यांनी फक्त चीनवर 100 टक्के टॅरिफची घोषणा केली. प्रत्यक्षात चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावला नाही.

भारताच्या विरोधात अमेरिकेने धरणे थेट चीनला हाताशी, डोनाल्ड ट्रम्प शी जिनपिंग यांच्यात फोनवर दीर्घ संवाद, चीनने..
US President Donald Trump and Chinese President Xi Jinping
| Updated on: Nov 25, 2025 | 3:16 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूवातीला चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. भारतावर अगोदरच 50 टक्के टॅरिफ लावलण्यात आला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर अनेक उद्योगांवर परिणाम झाला. मात्र, भारताने हे नुकसान भरून काढण्यासाठी मेगा प्लॅन तयार केला. त्याचा मोठा फायदा भारताला झाला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा कोणताही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार चर्चा सुरू असून ही व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकर दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र, भारतावरील टॅरिफबद्दल त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. भारत व्यापार करार पूर्ण होण्याच्या अगोदर लावण्यात आलेला टॅरिफ कमी करण्याच्या मुद्द्यावर कायम आहे. चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकीच फक्त अमेरिकेने दिली.

1 नोव्हेंबरपासून चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला जाईल, असे अमेरिकेने म्हटले. मात्र, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार झाले आणि कोणत्याही प्रकारचा टॅरिफ त्यांच्यावर लावण्यात आला नाही. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर चीन भारताची साथ देताना दिसला. मात्र, आता पुन्हा एकदा अमेरिक आणि चीनमधील जवळीकता वाढल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर चीनचे नेते शी जिनपिंग यांच्याशी दीर्घकाळ फोनवरून चर्चा केल्याचे नुकताच अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी पुढील वर्षी एप्रिलमध्ये चीनला भेट देणार असल्याचे स्पष्ट केले. अमेरिका आणि चीन एकत्र येत भारताच्या विरोधात मोठे षडयंत्र रचत असल्याचे सांगितले जातंय. अमेरिका चीनला हाताशी धरून भारताच्या विरोधात काही प्लॅन तयार करत असल्याचे मोठे संकेत आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आणि भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता विविध प्रकारे प्रयत्न केली जात आहेत.

रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, त्या चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. उलट अमेरिका चीनसोबतचे संबंध सुधारत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांनी एप्रिलमध्ये बीजिंगला भेट देण्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे आमंत्रण स्वीकारले आहे आणि पुढील वर्षी शी जिनपिंग यांना अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचे आमंत्रणही दिले आहे.