घ्या थोबाडीत मारून… जगाला भिकेला लावून डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट बाल्कनी डान्स, पाहा व्हिडीओ..

डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून लोकांनी चक्क डोक्याला हात लावली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध पेटवले. हे युद्ध तीन देशांपुरते मर्यादित राहिले नाही तर या युद्धाचा झळा थेटपणे अनेक देशांना बसत आहे. सर्वजण होरपळत आहेत.

घ्या थोबाडीत मारून... जगाला भिकेला लावून डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट बाल्कनी डान्स, पाहा व्हिडीओ..
Donald Trump
| Updated on: Mar 28, 2026 | 9:53 AM

अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर इराणकडून आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठे हल्ले करण्यात आली. इस्त्रायलच्या मोठ्या शहरांवर सतत हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यानंतर इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशात कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. काही देशात आणीबाणी लागण्याची स्थिती आहे. जागतिक बाजारात तेलाचे भाव गगणाला पोहोचत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करून मोठी चूक केल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. या युद्धात अनेक देश भरडले जात आहेत. थेटपणे झळ या युद्धाची जगाला बसत आहेत. ऊर्जेचे मोठे संकट उभे आहे, यातून मार्ग काढण्याकरिता कित्येक वर्ष जाण्याचे संकेत आहेत.

इतका शक्तीशाली देश अमेरिका असूनही जगातील एकही देश या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला पुढे आला नाही. एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा असून पेट्रोल-डिझेलसाठी लोक कसरत करत आहेत. हॉटेल बंद आहेत. जगाला देशोधडीला लावून डोनाल्ड ट्रम्प आनंद लुटताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ पुढे आला असून व्हाईट हाऊसच्या बाल्कनीत उभे राहून मस्त आनंदात डोनाल्ड ट्रम्प डान्स करताना दिसत आहेत.

जगाच्या तोंडचे पाणी पळून स्वत: मस्त बिनधास्तपणे डोनाल्ड ट्रम्प डान्स करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डान्सच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले की, दुसरीकडे आग लावून आनंद घेणे याला म्हणतात. दुसऱ्या एका युजर्सने कमेंट करत म्हटले की, इराणकडून मोठा हल्ला सऊदीच्या अरब प्रिंस सुलतान एअरबेसवर करण्यात आला. या हल्यात अमेरिकन सैनिक ठार झाले आणि हा असा नाचतोय…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या डान्सचा व्हिडीओ अमेरिकन लोकांनाही अजिबातच आवडत नाहीये. इराणमध्ये स्थिती भीषण आहे. यासोबतच अनेक देशात आताच्या घडीला कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा आहे. यामध्येच आग लावून तमाशा बघण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केले जात आहे. संपूर्ण जगाची मागणी आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध आता थांबले पाहिजे.

Follow Us