AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज ट्रम्प सामुद्रधुनी… इराणच्या होर्मुज खाडीला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव? थेट विधान, मोठी खळबळ, इराण..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच धक्कादायक दावे केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ उडाली. हेच नाही तर यानंतर इराण अजून पेटून उठण्याचीही शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करण्यात आला.

होर्मुज ट्रम्प सामुद्रधुनी... इराणच्या होर्मुज खाडीला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव? थेट विधान, मोठी खळबळ, इराण..
Donald Trump Strait of Hormuz
| Updated on: Mar 28, 2026 | 9:19 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानानंतर जगात खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मियामी येथील फेना फोरममध्ये आपल्या समर्थकांना संबोधित करताना काही असे दावे केले, त्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. इराण युद्ध आणि जागतिक भू-राजकारणावर यावर त्यांनी मोठे विधाने केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्वत: ला शांततावादी म्हणून घेतले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांना जर शांतता नोबेल पुरस्कार मिळाला नाही तर तो कोणालाही मिळू शकत नाही. इराणसोबतच्या युद्धाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, ऑपरेशन एपिक फ्यूरीच्या माध्यमातून आम्ही इराणच्या सैन्याला उद्धवस्थ केले. इराणची पूर्ण सैन्य ताकद धस्त झाली. आता इराण युद्धबंदीच्या कराराकरिता आमच्याकडे भीक मागत आहे.

हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट होर्मुजच्या सामुद्रधुनीचा उल्लेख करत ट्रम्प सामुद्रधुनी असेही म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडीला स्वत: चे नाव दिल्याने खळबळ उडाली. त्यांनी पुढे म्हटले की, माझ्यामुळे अमेरिकेला कट्टरपंथी शासनामुळे होणारा धोका आता कमी झाला. तिथे सर्वकाही आपण संपवले आहे. आपल्याकडे जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य आहे.

यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांना मारल्याचा उल्लेखही केला. यावेळी ब्रिटनचा मजाक उडवतानाही डोनाल्ड ट्रम्प दिसले. त्यांनी थेटपणे खिल्ली उडवत म्हटले की, मी यूकेच्या प्रधानमंत्र्यांना फोन केला होता. मी त्यांना म्हटले की, आम्हाला दोन एअरक्राफ्ट हवे आहेत. त्यांनी सांगितले की, ते खूप छोटे आहेत, ते खूप चांगलेही नाहीत, ते फास्ट उडत पण नाहीत.

मी त्यांना म्हटले की, तुम्ही आमची मदत करणार आहात का? त्यावर त्यांनी म्हटले की, हो नक्कीच… युद्ध संपल्यानंतर आम्ही तुमची मदत करू. ते नाटो आहे.. आपण नाटोची मदत केली पण ते मदत करत नाहीत. जर उद्या कधी मोठे युद्ध सुरू झाले तरीही ते आपल्यासोबत नसणार आहेत. नाटोवर आपण नाराज असल्याचे सांगताना डोनाल्ड ट्रम्प दिसले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?