AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! इराणकडून मोठा हल्ला, थेट अमेरिकेचे सैनिकच निशाण्यावर..

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर थेट युद्धाला सुरूवात झाली. आता युद्धात अमेरिका एका पाऊस मागे जाताना दिसत आहे. पण इराणकडून हार मानली जात नाही. यादरम्यानच इराणने मोठा दणका दिलाय.

जगात हाहाकार! इराणकडून मोठा हल्ला, थेट अमेरिकेचे सैनिकच निशाण्यावर..
Iran and America war
| Updated on: Mar 28, 2026 | 8:36 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. यादरम्यान अमेरिकेच्या अध्यक्षांनी 6 एप्रिलपर्यंत युद्धबंदीची घोषणा केली. युद्ध थांबवण्याकरिता करारांवर चर्चा सुरू आहे. इराणकडून अगोदरच 6 अटी युद्ध थांबवण्याकरिता ठेवण्यात आल्या. जोपर्यंत या अटी पूर्ण होणार नाहीत, तोवर आपण मागे हटणार नसल्याची इराणची भूमिका आहे. अमेरिकेकडून जरी 6 एप्रिलपर्यंत युद्धबंदीची घोषणा करण्यात आली असली तरीही इराणकडून हल्ले सुरूच आहेत. आता इराणच्या निशाण्यावर थेट अमेरिकेचे ठिकाणे आहेत. मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. या हल्ल्यामुळे स्थिती अधिक गंभीर बनल्याचे दिसत आहे. इराणकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिकेकडून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच इराणकडून हा हल्ला करण्यात आला. इराणकडून हा हल्ला सऊदी अरेबियाच्या प्रिंस सुलतान एअरबेसवर करण्यात आला.

या हल्ल्यात अमेरिकेच्या विमानांचे मोठे नुकसान झाले. इराणकडून अगोदरच इशारा देत सांगण्यात आले की, ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे लष्कर आहे, अशा ठिकाणी आम्ही हल्ला करणार आहोत. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर बोलताना अमेरिकेच्या लष्कर अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यात 12 पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले आहेत.

ज्यामध्ये दोन जणांची स्थिती अधिक गंभीर आहे. इराणच्या या हल्ल्यात अमेरिकच्या वायूसेनेच्या रिफ्यूलिंग एअरक्राफ्टचे मोठे नुकसान झाले. ज्यामुळे सैन्य ऑपरेशनवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. प्रेस टीव्हीने सॅटेलाईट फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये इराणी हल्ल्यात अमेरिकेचे बोइंग KC-135 स्ट्रैटोटैंकर दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे 300 पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले आहेत.

13 जणांचा जीव या युद्धात गेला. हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. युद्धात अमेरिकेचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. ज्यावेळी हे युद्ध सुरू झाले, त्यावेळी अमेरिकेला अजिबात वाटले नव्हते की, आपल्याकरिता हे युद्ध इतके जास्त कठीण असून शकते. युद्ध अधिक घातक होत आहे. सुरूवातीपासूनच अमेरिकेच्या लष्कर बेसला टार्गेट करून इराणकडून हल्ले केले जात आहेत. आताच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली.

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी