अमेरिका करणार या देशावर हल्ला, जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट आदेश..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगणे कठीण आहे. पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. त्यापूर्वी अमेरिकेने अत्यंत मोठा निर्णय घेतला असून थेट आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहेत.

अमेरिका करणार या देशावर हल्ला, जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट आदेश..
Donald Trump
| Updated on: Dec 03, 2025 | 8:47 AM

युक्रेन रशिया युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, त्यांना यश मिळताना दिसत नाही. त्यामध्येच त्यांच्या जावयाच्या शिष्टमंडळाचाही अपयश मिळाले. रशिया युक्रेन युद्धाच्या घमासानमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. त्यांच्या या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. हेच नाही तर यादरम्यान काही महत्वाचे करार देखील होणार आहेत. अमेरिका भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकत आहे भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नसून कमी केली आहे. यादरम्यान रशिया भारताला अत्यंत कमी किंमतीमध्ये कच्चे तेल देत आहे. अमेरिकेमुळे भारत आणि रशिया यांच्यातील अनेक वर्षांचे चांगले संबंध एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहेत. भारतावर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर रशियाने लगेचच स्पष्ट केली की, आम्ही आमच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंचे मोठ्या संख्येने स्वागत करू.

पुतिन यांच्या भारत दाैऱ्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. त्यांनी व्हेनेझुएलाच्या ड्रग्ज तस्करांना एक मोठा इशारा दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे व्हेनेझुएला आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत येणारे अख्ये जहाज अमेरिकन लष्कराने उठवले होते. व्हेनेझुएला म्हणणे आहे की, ड्रग्जच्या नावाखाली चुकीची कारवाई सुरू आहे.

व्हेनेझुएलामध्ये ड्रग्ज तस्करांच्या बोटींवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट सांगितले की, जमिनीवरही हे हल्ले करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेची समुद्रात कारवाई सुरू होती. मात्र, आता थेट व्हेनेझुएला शहरांमध्ये हल्ले करण्याचे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहेत.

जमिनीवरून हल्ला करणे खूप सोपे आहे, आम्हाला माहित आहे की वाईट लोक कुठे आहेत. आम्ही लवकरच त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात करणार आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे आता अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाकडून अगोदरच अमेरिकेच्या कारवाईला जोरदार विरोध केला आहे.