AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Word Ban : डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट घातली इंडियन शब्दावर बंदी, मोठी खळबळ, आता थेट..

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यामध्येच त्यांमी आता इंडियन शब्दाबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयामुळे भारत अमेरिकेतील संबंध तणावात आहेत.

Indian Word Ban : डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट घातली इंडियन शब्दावर बंदी, मोठी खळबळ, आता थेट..
Donald Trump Indian Word Ban
| Updated on: Dec 02, 2025 | 1:00 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. फक्त टॅरिफच नाही तर भारताबद्दल अनेकदा धक्कादायक विधाने करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण त्यांच्यावर ही कारवाई करत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, जगात सर्वाधिक तेल खरेदी रशियाकडून कोण करत असेल तर तो चीन आहे. मात्र, चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला नाही. भारताला अडचणीत आणण्यासाठी H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल अमेरिकेने केला. अमेरिकेत H-1B व्हिसावर जाऊन सर्वाधिक भारतीय लोक काम करतात. H-1B व्हिसावर आता तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारण्यात आले. हेच नाही तर मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारताने रशियाकडून पूर्णपणे तेल खरेदी बंद केली नाही तर आम्ही त्यांच्यावर अजून निर्बंध लादू.

आता पुन्हा एक डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल अत्यंत मोठे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेत आता इंडियन हा शब्द वापरला जाऊ नये, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून या शब्दावरून मोठा वाद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून भारतीय लोकांना मोठा धक्का बसेल. मात्र, त्यांनी हे भारतीय लोकांबद्दल बोलले नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प यांची ही टिप्पणी भारतातील भारतीयांसाठी नव्हती तर मूळ अमेरिकन लोकांसाठी आहे. ट्रम्प यांचे विधान एका मोठ्या सांस्कृतिक वादविवादाशी जोडलेले आहे. अनेक अमेरिकन संघटनांनी असा युक्तिवाद केला आहे की इंडियन हा शब्द जुना आणि वांशिकदृष्ट्या असंवेदनशील आहे. ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला आहे की, इंडियन हा शब्द फक्त भारतातील भारतीयांसाठी राखीव असावा आणि तो मूळ आदिवासींसाठी वापरू नये.

ट्रम्प हे आदिवासी गटांशी संबंधित वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कॅसिनो अधिकार आणि सार्वजनिक टिप्पण्यांवरील मतभेदांचा समावेश आहे. यावरून कायमच ते वादात अडकत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इंडियन शब्दाबद्दल मोठे विधान केले, यावरून काय प्रतिक्रिया पुढे येतात हे पाहण्यासारखे ठरेल.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच