पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र पण…डोनाल्ड ट्रम्प यांची बदलली भाषा, अमेरिकेकडून भारतावर दबाव, 25 टक्के कर…

अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले जाण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांनी भारतावर कर लादण्याचे स्पष्ट संकेत दिले असून आठवड्यांच्या शेवटी निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र पण...डोनाल्ड ट्रम्प यांची बदलली भाषा, अमेरिकेकडून भारतावर दबाव, 25 टक्के कर...
donald trump and pm modi
| Updated on: Jul 31, 2025 | 9:19 AM

अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले जाण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर नाराज आहेत. त्यांनी थेट बोलून दाखवले की, भारतामध्ये आणि आमच्यामध्ये सध्या सर्वकाही व्यवस्थित नाहीये. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाराजीचे प्रमुख कारण रशिया आहे. मागील काही दिवसांपासून भारत सतत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे आणि हेच ट्रम्प यांना पटत नाहीये. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दल मोठे विधान 

याच सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा कर लादणार असल्याचे स्पष्ट केले. व्यापार कराराबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, आम्ही सध्या टॅरिफवर चर्चा करत आहोत. याबाबत निर्णय घेतला जाईल. ब्रिक्स हा प्रत्यक्षात अमेरिका विरोधी गट आहे आणि भारत त्याचा सदस्य आहे. हा डॉलरवर थेट हल्ला आहे. मुळात म्हणजे आम्ही डॉलरवर कोणालाही हल्ला करू देणार नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र पण…

भारतासोबत आमची मोठी व्यापार तूट आहे. भारत आम्हाला खूप काही विकते पण आमच्याकडून काही खरेदी करत नाही. आम्ही त्यांच्याकडून खरेदी करत नाही कारण टॅरिफ खूप जास्त आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत, पण असे असले तरीही ते आमच्याशी जास्त व्यापार करत नाहीत. या बोलण्यावरून ट्रम्प यांनी मोठे संकेत दिली आहेत. 

भारत जगात सर्वाधिक कर लादतो

ट्रम्प म्हणाले, भारत जगात सर्वाधिक कर लादतो. पण आता त्यांना ते कमी करायचे आहे, पण बघूयात आता पुढे काय होते. सध्या तरी आम्ही भारतासोबत चर्चा करत आहोत. पुढे होईल काहीतरी. याचा फारकाही परिणाम होणार नाही. या आठवड्याच्या शेवटी सर्वकाही स्पष्ट होईल. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. चीन देखील अमेरिकेविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. भारत सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, हे देखील महत्वाचे ठरणार आहे.