जगाच्या मनात जे आहे तेच घडले, अमेरिका इराण युद्ध थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट भाष्य, कोणत्याही क्षणी..

28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इराण युद्ध सुरू झाले. हे युद्ध अधिक भडकताना दिसले. या युद्धामध्ये फक्त तीन देशांचेच नुकसान होत नाही तर संपूर्ण जगातील देशांचे नुकसान होत आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबद्दल थेट मोठे भाष्य केले.

जगाच्या मनात जे आहे तेच घडले, अमेरिका इराण युद्ध थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट भाष्य, कोणत्याही क्षणी..
Donald Trump and Iran war
| Updated on: Mar 21, 2026 | 7:57 AM

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराण हल्ला केला आणि युद्धाला सुरूवात झाली. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला आज 20 दिवस पूर्ण झाले. मात्र, युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. या युद्धामुळे जग संकटात आहे. काहीही करून युद्ध बंद करा, अशी मागणी केली जात आहे. कोणीही युद्धात मागे हटताना दिसत नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आखात थांबली आहे. तेल रिफायनरी आणि गॅस प्र्कल्पांवरही मोठे हल्ले होताना दिसत आहेत. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. तेलाच्या किमतीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. आम्हाला इराण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा कोणताही फटका बसणार नाही असा दावा करणाऱ्यांनाच या युद्धाचा सर्वाधिक फटका बसला.जगातून हे युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यादरम्यानच आता युद्ध थांबवण्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. एका तासात त्यांनी युद्धाबाबत वेगवेगळी दोन विधाने केली आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याबद्दल थेट म्हटले की, मला वाटते की, आता युद्ध संपले पाहिजे. इराण देखील हे युद्ध संपवण्याचा विचार करत आहे. अमेरिका आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या खूप जवळ नक्कीच पोहोचली आहे.  अमेरिका इराण युद्धातील आपली लष्करी कारवाई कमी करण्याचा विचार करत असल्याचे अत्यंत मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानामुळे थेट संकेत मिळत आहेत, की इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही क्षणी थांबू शकते. 28 फेब्रुवारी 2026 नंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याबद्दल भाष्य केले. या युद्धामुळे जगातील अनेक देश जैरीस आले. जगाला याचा फटका बसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. यामुळे अनेक देशात कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक तासापूर्वी अगोदर हे विधान करण्यापूर्वी म्हटले की, आपण बोलू शकतो, पण मला खरोखरच युद्धविराम नको आहे. दुसरी बाजू उद्ध्वस्त  करत आहोत, तेव्हा युद्धविराम चालत नाही. मुळात म्हणजे आम्ही तसा विचारही करत नाहीत. या युद्धात अमेरिका मजबूत स्थितीत आहे, इराणची खूप जास्त नुकसान होत असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. पहिल्यांदा युद्ध थांबवायचे नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आणि दुसऱ्यांदा बोलताना एका तासानंतर युटर्न घेत युद्ध थांबलण्याबद्दल भाष्य केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us