
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफमुळे तूफान चर्चेत आहेत. भारतावर त्यांनी 50 टक्के टॅरिफ लावला. हेच नाही तर टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात आहेत. मध्यंतरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे फोनही उचलणे बंद केले. मात्र, भारत हातातून जाताना दिसत असताना डोनाल्ड ट्रम्प एक पाऊस मागे टाकून परत एकदा भारतासोबत जवळीकता वाढताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महिला खासदाराबद्दल अत्यंत धक्कादायक आणि मोठे विधान केले, ज्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी महिला खासदार इल्हान उमरवर निशाना साधला. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी हिने आपल्या भावासोबत लग्न केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर लिहिले की, इल्हान उमरचा देश सोमालिया गरीबी, भूक, युद्ध, भ्रष्टाचार, दहशतवाद, हिंसासोबत लढत आहे. 70 टक्के लोक भयंकर गरीबी आणि भूकेने व्याकूळ आहेत.
जगातील सर्वात जास्त भ्रष्टाचाराच्या यादीत सोमालियाचे नाव पुढे आहे. या सगळ्या गोष्टींनंतरही इल्हान उमर आम्हाला शिकवत आहे की, अमेरिका कशी चालवायची. ही ती आहे ना…जिन्हे नागरिकत्व मिळवण्यासाठी चक्क आपल्या भावासोबत लग्न केल? खरोखरच आपल्या देशात हे असे विचित्र लोक आहेत. जे आम्हाला शिकवत आहेत की, काय केले पाहिजे आणि कसे केले पाहिजे. हेच नाही तर इल्हानवर काही कारवाई केली तर चांगले होईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इल्हान उमरबद्दल धक्कादायक विधान केले आहे. हेच नाही तर इल्हान उमर ही पहिल्यांदाच चर्चेत आली नाहीये. यापूर्वी इल्हान उमर हिने भारताबद्दल अत्यंत गंभीर विधान केले होते. त्यावेळी भारतातून तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. आता ती चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांनी कमेंट केली.