भारताची ताकद डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मान्य, चीनहून परतताच जोरदार काैतुक, थेट म्हणाले भारताचा..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर होते. चीन दाैऱ्याहून परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना भारताची आठवण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचे तोडभरून काैतुक करण्यात आले. भारताच्या जीडीपीबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले.

भारताची ताकद डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मान्य, चीनहून परतताच जोरदार काैतुक, थेट म्हणाले भारताचा..
US President Donald Trump
| Updated on: Nov 21, 2026 | 7:50 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दाैऱ्यावर होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील चीनच्या दाैऱ्यावर होते. तीन महासत्ता देश एकाच मंचावर आले. यादरम्यानचे फोटोही पुढे आली. चीन दाैरा करून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत परतले आहेत. अमेरिकेत जाताच डोनाल्ड ट्रम्प यांना भारताची आठवण झाली. डोनाल्ड ट्रम्प भारताचे तोंडभरून काैतुक करताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिका भारतासारखे कमी व्याज ठेवत असती तर अमेरिकेचा जीडीपी 15 ते 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला असता. अमेरिकेच्या सेन्ट्रल बँकने तसे केले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे उदाहरण देत म्हटले की, भारताचा विकास दर चांगला आहे. कारण ते व्याज कमी घेतात. मागच्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांचा सेन्ट्रल बँकचेसोबत वाद सुरू आहे. त्यातच अमेरिकेचा जीडीपी कमी होण्याचे खापर सेन्ट्रल बँकेवर डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये जेरोम पॉवेल यांना सेन्ट्रल बँकेचे चेअरमॅन बनवले होते. पण त्यांना व्याजात कोणत्याही प्रकारची कमी केली नाही. त्यानंतर पॉवेल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चांगलाच वाद रंगला. पॉवेल यांचे म्हणणे होते की, बिल्डिंगच्या खर्च 1.88 अरब डॉलरहून वाढून 2.46 अरब डॉलर झाला आहे. त्यानंतर ते पाहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प तिथे पोहोचले. पॉवेल यांनी पैशांची उधळपट्टी केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.

Loading...

हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉवेल विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे म्हटले होते. भारतात व्याज कमी असल्याने त्यांचा जीडीपी 7 टक्के असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह सिस्टमला FED म्हटले जाते. याचे काम फेडरल ओपन मार्केट कमेटीच्या माध्यमातून व्याजाला नियंत्रण केले जाते.

भारतात हे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये अमेरिकेतील सेन्ट्रल बँक ही एखाद्या राजकीय पक्षासारखे काम करते, त्यामुळे व्याज दर खूप जास्त आहे. कधी भारतावर टीका करताना तर कधी भारताचे काैतुक करताना डोनाल्ड ट्रम्प दिसतात. भारतीय निवडणूक आयोगाचेही काैतुक करताना डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपूर्वी दिसले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us