AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण ब्लॅकमेल करू शकत नाही.. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पुन्हा युद्धाला..

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे स्थिती नियंत्रणात येईल, असा जगाचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले. होर्मुज खाडी तणाव वाढल्याचे दिसत आहे.

इराण ब्लॅकमेल करू शकत नाही.. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पुन्हा युद्धाला..
US President Donald Trump
| Updated on: Apr 19, 2026 | 8:23 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला सुरूवात झाल्यापासूनच होर्मुज खाडीत तणाव बघायला मिळाला. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जगात कच्च्या तेलाचे मोठे संकट निर्माण झाले. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढताना दिसल्या. तेलाच्या किमती स्थिर ठेवण्याकरिता अमेरिकेने रशिया आणि इराण यांच्या तेलावरील निर्बंध हटवले. मात्र, होर्मुज खाडी बंद असल्याने स्थिती बिकड झाली. अनेक प्रयत्न करूनही होर्मुज खाडी खुली करण्यात अमेरिकेला यश आले नाही. त्यांनी होर्मुजकरिता अनेक देशांची मदतही मागितली. अमेरिकेने मोठी नाकेबंदी केली. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे एकही जहाज इराणी बंदरातून बाहेर पडू शकत नाही. इराणकडून मोठी घोषणा करत होर्मुज खाडी खुली करत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, त्यानंतरही भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडीत पुन्हा वाढलेल्या तणावात मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराण होर्मुज खाडीच्या माध्यमातून जगाला ब्लॅकमेल करू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, कित्येक वर्षांपासून इराण जगात अस्थिरता पसरवत आहे. आता स्थिती बदलत आहे. जोपर्यंत स्थिती बदलत नाही, तोपर्यंत करार होणार नाही. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले की, अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार आहे.

होर्मुज खाडी खुली केल्यानंतर अमेरिकेने नाकेबंदी काढावी, अशी मागणी इराणकडून करण्यात आली होती. मात्र, अमेरिकेने त्याला नकार दिला. इराण आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत बघायला मिळत आहे. होर्मुज खाडी इराणकडून खुली करण्यात आली पण तणाव आहे. त्यामध्येच भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला.

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार बैठक इस्लामाबादमध्ये होत आहे. या आज रात्री दोन्ही देशातील नेते पाकिस्तानमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. सोमवारी बैठक होईल, या बैठकीकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळले जात असल्याचे बघायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीमधून युद्धातून मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?