
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. फक्त टॅरिफच नाही तर भारताबद्दल अनेकदा धक्कादायक विधाने करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण त्यांच्यावर ही कारवाई करत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, जगात सर्वाधिक तेल खरेदी रशियाकडून कोण करत असेल तर तो चीन आहे. मात्र, चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला नाही. भारताला अडचणीत आणण्यासाठी H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल अमेरिकेने केला. अमेरिकेत H-1B व्हिसावर जाऊन सर्वाधिक भारतीय लोक काम करतात. H-1B व्हिसावर आता तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारण्यात आले. हेच नाही तर मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारताने रशियाकडून पूर्णपणे तेल खरेदी बंद केली नाही तर आम्ही त्यांच्यावर अजून निर्बंध लादू.
आता पुन्हा एक डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल अत्यंत मोठे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेत आता इंडियन हा शब्द वापरला जाऊ नये, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून या शब्दावरून मोठा वाद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून भारतीय लोकांना मोठा धक्का बसेल. मात्र, त्यांनी हे भारतीय लोकांबद्दल बोलले नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प यांची ही टिप्पणी भारतातील भारतीयांसाठी नव्हती तर मूळ अमेरिकन लोकांसाठी आहे. ट्रम्प यांचे विधान एका मोठ्या सांस्कृतिक वादविवादाशी जोडलेले आहे. अनेक अमेरिकन संघटनांनी असा युक्तिवाद केला आहे की इंडियन हा शब्द जुना आणि वांशिकदृष्ट्या असंवेदनशील आहे. ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला आहे की, इंडियन हा शब्द फक्त भारतातील भारतीयांसाठी राखीव असावा आणि तो मूळ आदिवासींसाठी वापरू नये.
ट्रम्प हे आदिवासी गटांशी संबंधित वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कॅसिनो अधिकार आणि सार्वजनिक टिप्पण्यांवरील मतभेदांचा समावेश आहे. यावरून कायमच ते वादात अडकत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इंडियन शब्दाबद्दल मोठे विधान केले, यावरून काय प्रतिक्रिया पुढे येतात हे पाहण्यासारखे ठरेल.