
भारत, चीन आणि रशिया यांची वाढलेली मैत्री पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट सुरू झालाय. यादरम्यान ते भारतासोबत कोणत्याही प्रकारचा पंगा घेऊ शकत नाही. कारण त्यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी म्हणून 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. यामुळे काहीही करून त्यांना अगोदरचे चांगले संबंध टीकून ठेवायचे आहेत. दुसरीकडे रशियाला अनेक धमक्या देऊन डोनाल्ड ट्रम्प थकले आहेत. मात्र, अमेरिकेच्या धमक्यांचा रशियावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नाही. उलट रशियाने अमेरिकला उत्तर देत युक्रेनवरील हल्ले वाढवली आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर चीन आहे. चीनविरोधात अमेरिकेने कुरापती सुरू केल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे सरकार अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे विमानतळ चीनच्या सीमेच्या अत्यंत जवळ असून याचे मुख्य कारण चीनच्या अण्वस्त्र केंद्रही जवळ आहे. अफगाणिस्तान युद्धादरम्यान हा अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ होता आणि आता त्यांना पुन्हा याच विमानतळावर नियंत्रण पाहिजे आहे. नाटो आणि अमेरिकेच्या सैन्याने हे विमानतळ 21 मध्ये सोडले.
हे विमानतळ सोडण्याच्या निर्णय त्यावेळी बायडेन यांनी घेतला होता. ब्रिटेनचे प्रधानमंत्री किएर स्टार्मर यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ही त्यावेळी बायडेन यांची सर्वात मोठी चूक होती. आता परत एकदा आम्ही अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला यावर नियंत्रण पाहिजे आणि अफगाणिस्तान सरकारला देखील आमची गरज आहे.
पण आणखी एक मोठे कारण म्हणजे ते चीनच्या त्या भागापासून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे, जिथे त्यांची अण्वस्त्रे बनवली जातात…आता डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून नक्कीच चीनचे टेन्शन वाढणार हे स्पष्ट आहे. हेच नाही तर चीनवर टॅरिफ लावण्यासाठी नाटो देशांवर दबाव टाकण्याचे काम हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केल जात आहे. तसे एक पत्रही त्यांनी दिले आहे.