Donald Trump : ट्रम्प यांची एक धमकीच पुरेशी, हमासने इस्रायलबाबत घेतला मोठा निर्णय
Donald Trump : अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये येताच जागतिक राजकारणात मोठे बदल सुरु आहेत. हमासला वठणीवर आणण्यासाठी ट्रम्प यांची एक धमकी पुरेशी ठरली आहे. अन्यथा घातक परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पुनरामन करताच हमासबद्दल कठोर भूमिका स्वीकारली आहे. हमासने सर्व इस्रायली बंधकांची लवकरात लवकर मुक्तता करावी. अन्यथा घातक परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. “गाझा युद्ध विराम करारातंर्गत हमास दुसऱ्या टप्प्यात एकाचवेळी उर्वरित सर्व बंधकांची सुटका करेल” असं वरिष्ठ हमास अधिकारी ताहिर अल-नुनु यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेचा हा परिणाम असल्याच मानलं जात आहे. या निर्णयाबद्दल मध्यस्थांना कळवण्यात आलं आहे, असं ताहिर अल-नुनु यांनी सांगितलं.
आम्ही मध्यस्थांना सांगितलय की, “हमास कराराच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व बंधकांची एकत्र सुटका करण्यासाठी तयार आहे” हमास मृत बंधकांचे मृतदेह कधी परत करणार? त्या बद्दल ताहिर अल-नुनु यांनी काही स्पष्ट केलं नाही. हे मृतदेह तिसऱ्या टप्प्यात परत करण्यात येणार आहेत. करारात ठरलेल्या दुसऱ्या टप्प्यानुसार युद्ध पूर्णपणे समाप्त होईल. इस्रायलला आपले सर्व सैनिक गाझामधून माघारी बोलवावे लागतील. त्याशिवाय गाझाच्या विकासाच काम सुरु होईल. बॉम्बवर्षावात उद्धवस्त झालेल्या इमारतींची पुन्हा बांधणी सुरु होईल. मानवीय सहाय्यता गाझामध्ये पोहोचेल.
मृतदेह इस्रायलकडे सोपवणार
हमास चार इस्रायली बंधकांचे मृतदेह परत करण्यास तयार आहे असं इस्रायली सुरक्षा पथकांनी सांगितलं. मृतदेह परत मिळाल्यानंतर एक छोटा सैन्य कार्यक्रम होईल. शिरी सिल्बरमॅन बिबास आणि त्यांची दोन लहान मुलं एरियल आणि केफिर यांचे मृतदेह इस्रायलला सुपूर्द करेल. इस्रायलच्या बॉम्ब वर्षावात त्यांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा आहे.
