"हा प्रश्न चीनला विचार" पत्रकाराला दरडावून डोनाल्ड ट्रम्प यांचा काढता पाय

अजूनही रोज नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत आहेत, तर कोरोना चाचण्या ही तुमच्यासाठी जागतिक स्पर्धा का आहे?" असा प्रश्न जियांग यांनी ट्रम्पना विचारला. (Donald Trump slams China-born reporter at media briefing)

"हा प्रश्न चीनला विचार" पत्रकाराला दरडावून डोनाल्ड ट्रम्प यांचा काढता पाय

न्यूयॉर्क : “कोरोना व्हायरस चाचणी ही जागतिक स्पर्धा म्हणून का पहिली जाते?” या प्रश्नावर “हा प्रश्न मला नाही, चीनला विचारा” अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन महिला पत्रकाराला दरडावले. व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये सोमवारी भरलेली पत्रकार परिषद अचानक आटोपती घेत ट्रम्प निघून गेले. (Donald Trump slams China-born reporter at media briefing)

“जर अमेरिकेतील 80 हजारांहून अधिक नागरिकांनी ‘कोरोना’च्या साथीमुळे आपला जीव गमावला आहे. तर कोरोना व्हायरस चाचणी ही जागतिक स्पर्धा म्हणून का पहिली जाते?” असा प्रश्न सीबीएस वृत्तवाहिनीच्या पत्रकार वेइझिया जियांग (Weijia Jiang) यांनी ट्रम्प यांना विचारला होता.

व्हाइट हाऊसमध्ये 27 एप्रिलनंतर भरलेली ट्रम्प यांची ही पहिली पत्रकार परिषद (मीडिया ब्रीफिंग) होती. यावेळी ‘अमेरिका (कोरोना) चाचण्यांमध्ये जगात आघाडीवर आहे” असं लिहिलेला फलक ट्रम्प यांच्या पाठीमागे लावण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी मास्कही घातला नव्हता.

“जर दररोज अमेरिकन नागरिक आपला जीव गमावत आहेत आणि अजूनही रोज नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत आहेत, तर कोरोना चाचण्या ही तुमच्यासाठी जागतिक स्पर्धा का आहे?” असा प्रश्न जियांग यांनी विचारला.

“बरं, जगात सर्वत्र नागरिक (कोरोनामुळे) आपला जीव गमावत आहेत. कदाचित हा प्रश्न आपण चीनला विचारला पाहिजे. मला विचारु नका. हा प्रश्न चीनला विचारा. जेव्हा आपण चीनला हा प्रश्न विचाराल, तेव्हा तुम्हाला एक अतिशय विलक्षण उत्तर मिळेल.” असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं.

ट्रम्प यांनी त्यानंतर सीएनएनच्या पत्रकार कॅटलन कॉलिन्स यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. पण मूळ प्रश्न विचारणाऱ्या जिआंग यांनी ट्रम्प यांना तोडत “सर, तुम्ही विशेषतः मला असे का म्हणालात?” असा प्रतिप्रश्न केला.

यावर “मी हे कुणाला उद्देशून सांगत नाही. मी असे विचित्र प्रश्न विचारणार्‍या पत्रकारांना सांगत आहे” असं उत्तर देत ट्रम्प पुढच्या पत्रकाराकडे वळले. पण अचानक “नाही, ठीक आहे” असं म्हणत सीएनएनच्या कॉलिन यांना ट्रम्प यांनी थांबवले.

(Donald Trump slams China-born reporter at media briefing)

आशियाई-अमेरिकन वंशाच्या वेइझिया जियांग यांच्यावर ट्रम्प यांनी केलेली टिप्पणी वर्णद्वेषी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे

(Donald Trump slams China-born reporter at media briefing)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *