Donald Trump : रशिया-युक्रेन युद्धात चूक कोणाची? जबाबदार देशाच्या भूमिकेतून डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा बरोबर बोलले

Donald Trump : ट्रम्प यांनी युरोपियन देशांवर टीका केली. कारण ते अजूनही रशियन तेल विकत घेत आहेत. त्याचवेळी अमेरिका नाटो देशांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र विकत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला.

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्धात चूक कोणाची? जबाबदार देशाच्या भूमिकेतून डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा बरोबर बोलले
Donald Trump
| Updated on: Nov 24, 2025 | 4:10 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक लांबलचक आणि टीका करणारं स्टेटमेंट पोस्ट केलं आहे. यात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धासाठी थेट माजी राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना जबाबदार धरलं आहे. “मजबूत आणि योग्य अमेरिकी तसचं युक्रेनी नेतृत्व असतं, तर हे युद्ध कधी सुरुच झालं नसतं. हा संघर्ष माझ्या दुसऱ्या कार्यकाळाच्या बऱ्याच आधी सुरु झालाय. बायडेन प्रशासन होतं, तेव्हापासूनच हे सर्व बिघडतच गेलं” असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय. ट्रम्प यांनी 2020 अमेरिकी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “त्या निवडणुकीत घोटाळा झाला नसता, तर रशिया-युक्रेन युद्धाची वेळच आली नसती. माझ्या पहिल्या कार्यकाळात रशिया-युक्रेन विषयावर कधीच चर्चाच झाली नाही. व्लादीमीर पुतिन यांनी कधी हल्लाच केला नसता” “पुतिन यांनी तेव्हाच हल्ला केला, जेव्हा त्यांनी स्लीप जो बायडेन यांना काम करताना पाहिलं आणि त्यांना संधी दिसली” असा ट्रम्प यांनी दावा केला.

“मला असं युद्ध वारशामध्ये मिळालं जे कधी खरंतर व्हायलाच नको होतं. प्रत्येकाचं यामध्ये नुकसान आहे. खासकरुन लाखो लोकांचे विनाकारण प्राण गेले. त्यांनी युक्रेनचं नेतृत्व आणि व्यवस्था यावर सुद्धा निशाणा साधला. तिथल्या सरकारने अमेरिकेच्या प्रयत्नासाठी शून्य आभार व्यक्त केले” असं ट्रम्प यांना वाटतं.

युरोपियन देश अजूनही विकत घेतात तेल

ट्रम्प यांनी युरोपियन देशांवर टीका केली. कारण ते अजूनही रशियन तेल विकत घेत आहेत. त्याचवेळी अमेरिका नाटो देशांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र विकत आहे. तीच शस्त्र नंतर युक्रेनला दिली जातात. त्यांनी बायडेन प्रशासनावर आरोप केला की, युक्रेनला सर्व त्यांनी फ्रि मध्ये दिलं. यात मोठी रक्कमही आहे.

अखेरीस ट्रम्प यांनी युद्ध हे मानवतेसाठी मोठं संकट असून सर्व मृतांना श्रद्धांजली वाहिली, ईश्वर त्या सर्व आत्म्यांना शांती देवो, ज्यांनी या युद्धात आपले प्राण गमावले असं ट्रम्प यांनी म्हटलं.