AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तानमध्ये होणार अणु युद्ध; युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा अहवाल, ट्रम्पची झोप उडाली

अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी बुधवारी खासदारांना सांगितले की, पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमध्ये अनेक भयानक गोष्टी आहेत.

भारत-पाकिस्तानमध्ये होणार अणु युद्ध; युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा अहवाल, ट्रम्पची झोप उडाली
trumpImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 19, 2026 | 4:55 PM
Share

सध्या मिडल इस्टमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश मिळूण इराणवर प्राणघातक हल्ला करताना दिसत आहेत. इराण देखील त्याला प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात भारत-पाकिस्तानमध्ये अणु युद्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता हा अहवाल नेमका काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अमेरिकी सीनेटमध्ये बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या ‘यूएस इंटेलिजेंस कम्युनिटी’च्या वार्षिक खतरा अहवालात भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमुळे अणु संघर्षाचा धोका कायम असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. ३४ पानांच्या या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान थेट युद्ध सुरू करण्याची इच्छा नसली तरी दहतवादी घटकांना संकटे निर्माण करण्याची परिस्थिती अद्याप कायम आहे. अहवालात म्हटले आहे, “भारत-पाकिस्तान संबंधांमुळे अणु संघर्षाचा धोका सदैव कायम आहे. यापूर्वी दोन्ही परमाणु शक्तींपन्न देशांमध्ये अनेक वेळा तणावपूर्ण वाद झाले आहेत. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याने अशा प्रकारच्या संघर्ष भडकवणाऱ्या हल्ल्यांचा धोका पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.”

अहवालात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्तक्षेपामुळे अलीकडील परमाणु तणाव कमी झाला असला तरी, दहशतवादी घटकांना संकटे निर्माण करण्याची पार्श्वभूमी अजूनही विद्यमान आहे. दोन्ही देश खुले युद्ध टाळू इच्छितात, परंतु परिस्थिती अशा प्रकारची आहे की, कोणतीही छोटाशी घटना मोठा संघर्ष निर्माण करू शकते.

याशिवाय, पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध तणावपूर्ण असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. सीमेपलीकडील झडपा सुरूच आहेत. इस्लामाबाद अफगाणिस्तानात पाकिस्तानविरोधी आतंकवादी गटांच्या उपस्थितीमुळे सतत नाराज आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानात दहशतवादी हिंसाचार वाढत चालला आहे.

तुलसी गबार्ड यांचे विधान

अमेरिकेच्या राष्ट्रीय खुफिया संचालिका तुलसी गबार्ड यांनी सीनेट गुप्त समितीसमोर सांगितले की, पाकिस्तानकडे असलेल्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाइलांमध्ये अमेरिकेला लक्ष्य करण्याची क्षमता असलेल्या मिसाइलांचा समावेश असू शकतो.

त्या पुढे म्हणाल्या, “सध्या अमेरिकेला असलेला धोका ३,००० हून अधिक मिसाइल्सपासून २०३५ पर्यंत १६,००० हून अधिक मिसाइल्सपर्यंत वाढणार आहे.” तुलसी गबार्ड यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेची मजबूत अणु प्रतिबंधक क्षमता देशाला सामरिक धोक्यांपासून संरक्षण देते. मात्र रूस, चीन, उत्तर कोरिया, इराणं आणि पाकिस्तान या देशांकडून परमाणु आणि पारंपरिक पेलोडसह नवीन, प्रगत मिसाइल वितरण प्रणालींचे संशोधन आणि विकास सुरू आहे, ज्यामुळे अमेरिकेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?