AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाची याचिका कोर्टाने फेटाळली; भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाची प्रत्यार्पण याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राणावर लष्कर-ए-तोयबाला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत बऱ्याच काळापासून प्रयत्न करत होता. राणाने त्याचे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाची याचिका कोर्टाने फेटाळली; भारतात आणण्याचा मार्ग मोकळा
Tahawwur Rana Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 08, 2025 | 1:18 PM
Share

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणायाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आपले भारतात प्रत्यार्पण करू नये, अशी विनंती केली होती. राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा साथीदार म्हणून ओळखला जातो. हेडली हा 26/11 च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. राणावर 26/11 च्या हल्ल्यातही महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. अशा तऱ्हेने तो भारतात आल्यावर त्याच्यावर खटला चालवला जाईल.

सोमवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तहव्वुर राणाच्या अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानी वंशाचा 64 वर्षीय कॅनेडियन नागरिक राणा सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत. तहव्वुर राणा याने 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्याने बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेवर सुनावणी होईपर्यंत त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यात यावी, असे म्हटले होते.

न्यायमूर्ती एलेना कागन यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सहयोगी न्यायाधीश आहेत. गेल्या महिन्यात कागन यांनी हा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर राणा याने नव्याने अर्ज दाखल केला. राणा याच्या नव्या अर्जावर 4 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर हा अर्ज फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राणा यानी भारतातील छळासाठी युक्तिवाद केला होता

ट्रम्प प्रशासनाने तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. यानंतर तो कोर्टाच्या माध्यमातून त्याचे प्रत्यार्पण रोखण्याचा प्रयत्न करत आहे. राणाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, त्याचे भारतात प्रत्यार्पण करणे हे अमेरिकेच्या कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या अत्याचारविरोधी कराराचे उल्लंघन आहे. मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि पाकिस्तानी वंशाचा मुस्लीम असल्याने भारतात छळ होण्याचा धोका असल्याचेही त्यानी याचिकेत म्हटले आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात राणा हा भारताला हवा होता. 64 वर्षीय राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा साथीदार म्हणून ओळखला जातो. हेडली हा 26/11 च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. राणावर 26/11 च्या हल्ल्यातही महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. अशा तऱ्हेने तो भारतात आल्यावर त्याच्यावर खटला चालवला जाईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...