India-EU FTA : भारताबद्दल मनात इतका आकस, EU सोबतच्या ट्रेड डीलमुळे खवळलेल्या अमेरिकेच्या मनातलं पुन्हा बाहेर आलं

India-EU FTA : भारत आणि युरोपियन संघामध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. ज्यावरुन अमेरिका मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहे. अमेरिकेला हे पटलेलं नाही. ट्रम्प यांच्या जवळच्या माणसाने पुन्हा एकदा भारत-EU ट्रेड डीलवर भाष्य केलं आहे. ज्यातून त्यांची नाराजी दिसून येते.

India-EU FTA : भारताबद्दल मनात इतका आकस, EU सोबतच्या ट्रेड डीलमुळे खवळलेल्या अमेरिकेच्या मनातलं पुन्हा बाहेर आलं
Donald Trump
| Updated on: Jan 29, 2026 | 9:21 AM

भारत आणि युरोपियन संघामध्ये झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे अमेरिका खूपच अस्वस्थ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेंट यांच्या स्टेटमेंटमधून पुन्हा एकदा हे दिसून आलं आहे. भारत आणि EU मधील या करारामुळे अमेरिकेला मिर्च्या झोंबल्या आहेत. अमेरिकेला हे सहनच होत नाहीय. ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी भारत आणि युरोपियन संघामध्ये झालेल्या या ऐतिहासिक व्यापार करारावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. “युरोपियन युनियनने युक्रेनी जनतेचं समर्थन करण्याचा आपला शब्द पाळलेला नाही. उलट ते आता कमर्शिअल हिताला प्राधान्य देतायत” असा आरोप बेसेंट यांनी केला. युरोपियन संघाच्या निर्णयामुळे आम्ही खूप निराश आहोत असं सीएनबीसीशी बोलताना स्कॉट बेसेंट म्हणाले.

“एका बाजूला युरोप युक्रेनच्या समर्थनाची गोष्ट बोलतो. दुसरीकडे ते रशियन तेल वापरणाऱ्या भारतासोबत मदत ऑफ ऑल डील करत आहेत” असं स्कॉट बेसेंट म्हणाले. ‘जे त्यांच्यासाठी चांगलं आहे तेच त्यांनी केलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, मला युरोपियन लोक खूप निराशाजनक वाटतात’ असं बेसंट यांनी वक्तव्य केलंय. रशियन कच्चा तेलापासून बनलेली रिफाइंड उत्पादनं युरोप भारताकडून विकत घेतोय असं बेसेंट म्हणाले. अमेरिकेत भारतीय सामानाच्या निर्यातीवर 50 टक्के टॅरिफ आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेने हा टॅरिफ लावला आहे.

भारतासाठी अमेरिकेने काय संकेत दिले?

अमेरिकेवरील युरोपच अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने EU ने भारतासोबत FTA करार केला आहे. या करारानुसार 97 टक्के वस्तुंवरील टॅरिफ कमी होईल किंवा संपून जाईल. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली, तर अमेरिका टॅरिफ हटवण्याचा विचार करु शकते असे संकेत बेसेंट यांनी दिलेत.

अमेरिकी अधिकारी निराशा

यूरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी या कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं आहे. या डील अंतर्गत जवळपास 97 टक्के उत्पादनांवरील टॅरिफ कमी करणं किंवा संपवण्याचा उद्देश आहे. अमेरिकेचा सध्या जगातील अनेक देशांसोबत व्यापारी तणाव सुरु आहे. त्यावेळी बेसेंट यांनी हे वक्तव्य केलय. EU ने जुलै महिन्यात अमेरिकेसोबत फ्रेमवर्क एग्रीमेंट केलं. पण त्या अंतर्गत टॅरिफ घटवलेला नाही, या बद्दलही अमेरिकी अधिकाऱ्याने निराशा व्यक्त केली.