India-EU Trade Deal : अमेरिकेचा एवढा जळफळाट झाला, त्या भारत-EU ट्रेड डीलवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया काय?
India-EU Trade Deal :भारत आणि युरोपियन युनियनमध्ये आज एक ऐतिहासिक करार झाला. अमेरिकेच्या प्रतिक्रियेवरुन सगळ्या जगाने या कराराची दखल घेतलीय असं म्हणणं चुकीच ठरणार नाही. हा करार भारतासह युरोपला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाईल. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया काय?.

जवळपास दोन दशकं चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि युरोपीयन संघाने आज 27 जानेवारीला ऐतिहासिक व्यापार कराराची घोषणा केली. ही घोषणा 16 व्या भारत-EU शिखर सम्मेलनात झाली. युरोपीय परिषदेचे राष्ट्रपती एंटोनियो लुइस सैंटोस दा कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन हे दोघे या बैठकीचे सहअध्यक्ष होते. दोन्ही नेते भारताच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या फ्री ट्रेड एग्रीमेंट करारामुळे भारत-EU संबंध अजून बळकट होतील. यात व्यापार, सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा सारख्या महत्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढेल. ही डील दोन्ही बाजूंसाठी आर्थिक आणि रणनितीक दृष्टीने महत्वाची मानली जातेय. अमेरिकेने ही डील होण्याआधी एक प्रतिक्रिया दिली. त्यातून त्यांची अस्वस्थतता दिसून आली. ‘युरोप आपल्या विरुद्ध युद्धासाठी फंड देतोय’ असं ट्रम्प यांचा मंत्री म्हणाला.
“आज भारताने इतिहासातील सर्वात मोठं मुक्त व्यापार करार केला. 27 जानेवारी रोजी भारताने 27 युरोपियन देशांसोबत FTA साइन केलं. यामुळे गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळेल. नवीन इनोवेशन पार्टनरशिप बनेल. जागतिक स्तरावर सप्लाय चेन मजबूत होईल. हा फक्त एक व्यापार करार नाहीय. संयुक्त समृद्धिची एक ब्लूप्रिंट आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-EU फ्री ट्रेड एग्रीमेंटवर बोलले.
आज एक नवीन युग सुरु झालय
“हा करार स्पष्ट अजेंडा देईल. संयुक्त समृद्धी पुढे घेऊन जाईल. लोकांचे परस्परांशी संबंध दृढ होतील. भारत-इयूचं सहकार्य एक ग्लोबल क्रूड आहे” असं पीएम मोदी म्हणाले. ‘या करारातंर्गत आपण IMEA कॉरिडोर पुढे नेऊ’ पीएम मोदी यांनी जागतिक संस्थांच्या सुधारणांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. ‘रिफॉर्म आवश्यक आहेत’ असं ते म्हणाले. “आज एक नवीन युग सुरु झालय. भारत-ईयू परिषदेतील हा महत्वाचा क्षण आहे. संयुक्त भविष्यासाठी ईयू नेत्यांच्या सहकार्यासाठी” पीएम मोदी यांनी त्यांचे आभार मानले.
एकत्रितपणे काम करु
‘भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठं फ्री ट्रेड एग्रीमेंट आहे’ असं पीएम मोदी म्हणाले. “ही संयुक्त समृद्धीची ब्लू प्रिंट आहे. आज मेरीटाइम, सायबर सिक्योरिटी आणि दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे काम करु. इंडो पॅसिफिकमध्ये आमचं सहकार्य वाढेल. आमच्या डिफेन्स कंपन्या संयुक्त डेवलपमेंटचे पर्याय शोधतील” असं पीएम मोदी म्हणाले.
