AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Midnight Hammer : इराणमध्ये ऑपरेशन फक्त सात B 2 बॉम्बर्सनी केलं, मग अमेरिकेने 125 फायटर जेट्स का पाठवलेली?

Operation Midnight Hammer : अमेरिकेने इराण विरुद्ध केलेल्या ऑपरेशन मिडनाइट हॅमर्सचे डिटेल्स समोर आले आहेत. अमेरिकेने या खास मिशनसाठी 132 च्या आसपास विमान वापरली. मिशनच्यावेळी फक्त सात विमानांनी हल्ले केले, मग उर्वरित 125 फायटर जेट्सनी काय केलं?. अमेरिकेने या सगळ्या ऑपरेशनसाठी काय रणनिती वापरली?

Operation Midnight Hammer : इराणमध्ये ऑपरेशन फक्त सात B 2 बॉम्बर्सनी केलं, मग अमेरिकेने 125 फायटर जेट्स का पाठवलेली?
B2 BomberImage Credit source: USAF
| Updated on: Jun 23, 2025 | 11:02 AM
Share

22 जून 2025 च्या सकाळी जगाने एका ऐतिहासिक सैन्य ऑपरेशनबद्दल ऐकलं, ज्याचं नाव होतं मिडनाइट हॅमर. या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेने इराणचे तीन अण्विक तळ फॉर्डो, नतांज आणि इस्फान नष्ट केले. या तिन्ही अण्विक तळांवर अत्यंत अचूक हवाई हल्ले केले. या मिशनमध्ये 125 पेक्षा जास्त विमानं, 7 B-2 स्टेल्थ बॉम्बर्स आणि 30 पेक्षा जास्त टोमाहॉक मिसाइल्स वापरली. अमेरिकेने अत्यंत चतुर रणनितीने डिकॉय करुन इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा दिला. हा हल्ला सुरु असताना इराणला काहीच प्रत्युत्तर देता आलं नाही. या संपूर्ण ऑपरेशनची स्टोरी, त्यात वापरण्यात आलेली शस्त्र, मिसाइल्स आणि विमानांबद्दस समजून घ्या. इराणचा अणवस्त्र कार्यक्रम नष्ट करणं हा अमेरिकेच्या ऑपरेशन मिडनाइट हॅमरचा उद्देश होता. कारण इराणचा अणवस्त्र कार्यक्रम हा अमेरिका आणि इस्रायलसाठी मोठा धोका बनला असता. अमेरिकेची 21 जून 2025 रोजी या युद्धात एन्ट्री झाली. अमेरिकन एअर फोर्स आणि नौदलाने मिळून ऑपरेशन मिडनाइट हॅमर केलं.

या मिशनची योजना अनेक महिने आधी बनवण्यात आली होती. हा सगळा प्लान गुप्त ठेवण्यात आला होता. फक्त काही निवडक लोक जसे की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि चीफ ऑफ स्टाफचे चेअरमन जनर डॅन केन यांनाच याबद्दल माहित होतं.

दिशाभूल करण्याची रणनिती काय?

काही B-2 बॉम्बर्सने जाणूनबुजून प्रशांत महासागराच्या दिशेने पाठवण्यात आलं. जेणेकरुन इराणला वाटावं की, हल्ला दुसऱ्या दिशेने होणार आहे. डिकॉय करण्यासाठी ही B-2 बॉम्बर्स विमानं गुआमच्या अँडरसन एअर फोर्स बेसकडे पाठवण्यात आलं. जेणेकरुन इराणच लक्ष विचलित होईल. एका B-2 विमानाला हवाई येथे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.

किती तासाच उड्डाण?

अमेरिकेवरुन इराणपर्यंत पोहोचण्यासाठी या B-2 बॉम्बर विमानांना 18 तास लागले. यावेळी या विमानांनी आपसात खूप कमी कम्युनिकेशन केलं. जेणेकरुन इराणचे रडार आणि हेरगिरी यंत्रणेला काही कळू नये.

125 फायटर जेट्स का?

अमेरिकेने इराणवर हल्ल्यासाठी 7 B-2 बॉम्बर विमानं वापरली. पण त्यांच्यासोबत पाचव्या पिढीची फायटर जेट्स F-22 रॅप्टर, F-35 लायटनिंग ही विमानं सोबत होती. B-2 बॉम्बर विमानांच्या पुढे या फायटर जेट्सचा उड्डाण सुरु होतं. या फायटर जेट्सनी इराणच्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या SAM मिसाइल्सना नष्ट केलं. या जेट्सनी HARM हाय-स्पीड अँटी-रेडिएशन मिसाइल्सचा वापर करुन इराणची रडार सिस्टिम नष्ट केली. B-2 बॉम्बरची सुरक्षा निश्चित करणं ही सुद्धा या फायटर जेट्सवर जबाबदारी होती.

S-300 सिस्टिम फेल

इराणची S-300 ही रशियन एअर डिफेन्स सिस्टिम B-2 बॉम्बर्स विमानं पाहू शकली नाही. कारण स्टेल्थ विमानं रडारवर दिसत नाहीत. “इराणच्या फायटर जेट्सनी उड्डाण केलं नाही. त्यांच्या मिसाइल प्रणालीने आम्हाला पाहिलच नाही” असं जनरल डॅन केन यांनी सांगितलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.