AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंटा व्हायरसवर लस उपलब्ध आहे का ? लक्षणे काय ? काय काळजी घ्यावी ?

हंटा व्हायरस हा एक विषाणूजन्य संसर्गाचा आजार आहे. अलीकडे जगभरात याआजाराबद्दल चिंता वाढत असून, या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लस उपलब्ध आहेत का ? चला माहिती घेऊयात...

हंटा व्हायरसवर लस उपलब्ध आहे का ? लक्षणे काय ? काय काळजी घ्यावी ?
vaccine available for the Hantavirus
| Updated on: May 09, 2026 | 9:22 PM
Share

अंटार्टिकावर सहलीसाठी गेलेल्या लक्झरी क्रुझ शिप ‘MV हॉन्डियस’ मध्ये एका रहस्यमय व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे.१ एप्रिल रोजी अर्जेंटीनाहून रवाना झालेल्या या जहाजात बसलेल्या प्रवाशांना ताप आणि श्वसनाचा त्रासाची तक्रार आल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तपासणीत हा उंदरापासून उंदरामध्ये पसरणारा खतरनाक ‘ऐंडीझ हंटा व्हायरस’ असल्याचे उघडकीस आले आहे. हा व्हायरस उंदरापासून माणसात देखील पसरतो असे उघड झाले आहे. जोहान्सबर्ग ते युरोपात या व्हायरसने हाहाकार माजला आहे. आता जागतिक आरोग्य संघटना त्या प्रवाशांना शोधत आहे जे मधल्या रस्त्यात या क्रुझ जहाजातून उतरुन आपल्या घरी गेले आहेत. या हंटा व्हायरसवर लस उपलब्ध आहे का ? चला पाहूयात….

हंटा व्हायरस एक व्हायरल संक्रमण असून ते उंदीर वा त्यांच्या मल-मूत्राच्या संपर्कातून पसरते.काही प्रकरणात हा आजार जीवघेणा होऊ शकतो. कारण या संसर्गामुळे फुप्फुस आणि किडनी प्रभावित होऊ शकते. जगभरातील संशोधक अनेक वर्षांपासून या व्हायरसचा अभ्यास करत असून त्याच्यापासून वाचण्याचे उपाय शोधत आहेत.

कोणत्या नव्या आणि कमी चर्चित व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यास लोकांमध्ये चिंता पसरणे स्वाभाविक आहे. मात्र, लसीचा विकास एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. ज्यात सुरक्षा आणि प्रभावशीलतेची अनेक स्तरावर तपासणी केली जाते. मात्र, या हंटा व्हायरसवर जगभरात लसीचा विकास कोणत्या टप्प्यावर आला आहे ? कोणत्या देशात या लसीवर संशोधन सुरु आहे हे पाहूयात…

हंटा व्हायरसवर लस उपलब्ध आहे का ?

सध्या तरी हंटा व्हायरससाठी अशी कोणतीही व्यापक रुपात व्हॅक्सीन उपलब्ध नाही. जिचा जगभरातील लोक नियमित रुपाने वापर करु शकतील. काही देशात मर्यादित वापरासाठी व्हॅक्सीन विकसित केली आहे, मात्र, तिचा उपयोग प्रत्येक जागी केला जात नाही.

संशोधक अशा व्हॅक्सीनला विकसित करण्यावर काम करत आहेत. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हंटा व्हायरसपासून सुरक्षा देऊ शकतील. या व्हायरसचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे यावर प्रभावशाली व्हॅक्सीन तयार करणे आव्हानात्मक मानले जात आहे. यामुळे यापासून बचावासाठी स्वच्छता आणि संक्रमण यापासून दूर राहाणे हाच सध्या महत्वाचा उपाय मानला जात आहे.

कोणत्या देशात लसीचे संशोधन सुरु ?

हंटा व्हायरसवर अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरिया सारख्या देशात अनेक वर्षांपासून संशोधन सुरु आहे. या देशातील संशोधनक या व्हायरसच्या वेगवेगळ्या स्ट्रेन्सच्या विरोधात प्रभावी व्हॅक्सीन विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही संस्था नव्या तंत्रज्ञानाद्वारे चांगली आणि सुरक्षित व्हॅक्सीन तयार करण्यावर काम करत आहेत. मात्र, या क्षेत्रात आणखी अभ्यास आणि संशोधनाची गरज आहे.

हंटा व्हायरसपासून वाचण्याचे उपाय काय ?

हंटा व्हायरसपासून बचावासाठी स्वच्छता हाच सर्वात सोपा उपाय आहे. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. घरात उंदीर येऊ नयेत याची काळजी घ्यावी. त्यांच्या मल-मूत्रांपासूनच हा आजार पसरत असल्याने उंदीरांपासून सावध रहावे. धुळीच्या वातावरणात काम करताना वा स्वच्छता करताना हातात मोजे आणि नाकावर मास्क लावणे गरजेचे आहे. खाण्या पिण्याच्या वस्तू नीट झाकून ठेवाव्यात. ताप, थकवा वा श्वास घेण्यास त्रास होत असेल कर तातडीने डॉक्टरांना दाखवणेच हेच सध्या तरी उपाय आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?