मशीनमध्ये पैसे टाका अन् बंदुकीच्या गोळ्या मिळवा… ग्रोसरी स्टोर्समध्ये व्हेडिंग मशीन

vending machine in usa: अमेरिकेतील अनेक किराणा दुकानांमध्ये या व्हेंडिंग मशिन्स बसवण्यासही विरोध होत आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2024 मध्ये आतापर्यंत सामूहिक गोळीबाराच्या अशा 15 घटना घडल्या आहेत.

मशीनमध्ये पैसे टाका अन् बंदुकीच्या गोळ्या मिळवा... ग्रोसरी स्टोर्समध्ये व्हेडिंग मशीन
vending machine
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 2:38 PM

आपल्याकडे ठिकठिकाणी एटीएम मशीन आहेत. त्यातून पैसे काढण्याची सुविधा आहे. रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी व्हेंडिग मशीन आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेत दूध आणि अंडी मिळवण्यासाठीही व्हेंडिग मशीन आहेत. अनेक मॉल आणि ग्रोसरी स्टोअर्समध्ये ते मशीन लावले आहेत. परंतु धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत ग्रोसरी स्टोअर्समध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे व्हेडिंग मशीन लावले आहेत. त्याठिकाणी गोळ्या सहज खरेदी करता येतात. अमेरिकेत गोळीबाराचे प्रकार जगात सर्वाधिक होतात. त्यानंतरही बंदुकीच्या गोळ्या मिळवणारे व्हेंडिग मशीन ठेवल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.

या ठिकाणी लावले मशीन

अमेरिकेतील अलाबामापासून ओकलाहोमा आणि टॅक्सासमधील ग्रोसरी स्टोअरवर बंदुकाच्या गोळ्या मिळणारे मशीन लावले आहेत. दूधाच्या व्हेंडिंग मशीन शेजारी बदुकांच्या गोळ्या मिळवणारे मशीन लावले आहे. हे मशीन एटीएम प्रमाणे विकसित करता येते.

हे सुद्धा वाचा

कोणत्या कंपनीने सुरु केली सुविधा

अमेरिकन राउंड्स नावाची कंपनी व्हिडिंग मशीन ग्रोसरी स्टोअरमध्ये लावत आहेत. आतापर्यंत अलाबामापासून ओकलाहोमापर्यंत आणि टेक्सासमध्ये हे मशीन लावले आहे. या व्हेंडिंग मशीनमध्ये एक आयडेंटिफिकेशन स्कॅनर आणि फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे बंदुकीच्या गोळ्या घेणाऱ्याच्या वयाची माहिती मिळवता येते. त्यानंतरच संबंधित व्यक्तीला मशीनमधून बंदुकीच्या गोळ्या मिळवता येईल.

वयाचे प्रमाणपत्र द्यावे लागते

कंपनीचा दावा आहे की, वय व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजीमुळे अधिक फायदा आहे. अन्यथा ऑनलाईन गोळ्या खरेदी करताना कोणत्या वयोगटातील व्यक्ती ते घेत आहे, त्याची माहिती मिळत नाही. परंतु व्हेंडिग मशीनमध्ये व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजीमुळे वयाचे प्रमाणपत्र रिटेल स्टोरमध्ये द्यावे लागते. या व्हेंडिग मशीनमध्ये २१ वर्ष वयाचे व्यक्ती सहज गोळ्यांची खरेदी करु शकतात.

अमेरिकेत विरोध सुरु

अमेरिकेतील अनेक किराणा दुकानांमध्ये या व्हेंडिंग मशिन्स बसवण्यासही विरोध होत आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2024 मध्ये आतापर्यंत सामूहिक गोळीबाराच्या अशा 15 घटना घडल्या आहेत. या स्थितीत किराणा दुकानात खुलेआम गोळ्या मिळत असल्याने गोळीबाराच्या घटनांमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

Non Stop LIVE Update
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?.
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?.
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण...
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण....
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो.
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत.
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य.
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा.
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले.
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान.
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?.