
पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच तणावात आले. भारताने थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. हिंदू पर्यटकांना टार्गेट करत दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला अत्यंत भयंकर होता आणि त्याचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आले. भारत आणि पाकिस्तानमधील दीर्घकाळापासूनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ढाकामधील एका फोटोने पाकिस्तानात मिरर्च्या लागल्या. त्या फोटोनंतर पाकड्यांची झोपच उडाली. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी हस्तांदोलन केल्याने पाकिस्तानचे नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अयाझ सादिक यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये हा मोठा मुद्दा झाला असून सतत खुलासे केले जात आहेत.
अयाझ सादिक यांनी आता यादरम्यान मोठा दावा केला असून बढाई मारत त्यांनी म्हटले की, ढाकामधील बैठकीदरम्यान स्वत: एस. जयशंकर हे माझ्याकडे चालत आले आणि त्यांनी माझी भेट घेतली. एस. जयशंकर आणि अयाज सादिक हे दोघेही बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालेदा झिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी ढाका येथे पोहोचले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटत हस्तांदोलन केले.
मे महिन्यातील मोठ्या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानच्या उच्च नेत्यांची ही पहिलीच भेट म्हणावी लागेल. एस. जयशंकर आणि अयाज सादिक यांच्य भेटीचे फोटो पुढे आले. फोटोमध्ये दोन्ही नेते एकमेकांच्या हातात हात घालून बोलताना दिसत आहेत. भारताने या गोष्टीला फार जास्त सहजपणे घेतले. मात्र, पाकिस्तानमधील एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना अयाज सादिक यांनी मोठा दावा केला.
अयाझ सादिक यांनी म्हटले की, एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ संसदेच्या प्रतीक्षालयात आले होते आणि जयशंकर स्वतः येऊन मला भेटले. यावेळी प्रतीक्षालयात अनेक देशांचे अधिकारी तिथे उपस्थित होते. उपस्थित इतरांना भेटल्यानंतर जयशंकर हे माझ्याकडेही आले आणि त्यांनी माझ्यासोबत हस्तांदोलन केले. त्यावेळी ते पाकिस्तानी उच्चायुक्तांशी बोलत होते. मी ज्यावेळी माझी ओळख जयशंकर यांना करून देत होतो, त्यावेळी त्यांनी म्हटले की, मी तुम्हाला ओळखतो, वेगळी ओळख नका करून देऊ..