AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : भाषण संपल्यानंतर मास्क घालण्यास विसरल्या अँजेला मर्केल, पुढे असं घडलं की व्हीडिओ व्हायरल

जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांचा हा व्हीडिओ आहे. ज्यामध्ये भाषण दिल्यानंतर व्यासपीठावरच त्या आपला मास्क विसरता आणि सीटवर बसतात. त्यानंतर जे काही झालं त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Video : भाषण संपल्यानंतर मास्क घालण्यास विसरल्या अँजेला मर्केल, पुढे असं घडलं की व्हीडिओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Feb 22, 2021 | 2:09 PM
Share

बर्लिन : सोशल मीडियावर सध्या अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ समोर आला आहे. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांचा हा व्हीडिओ आहे. ज्यामध्ये भाषण दिल्यानंतर व्यासपीठावरच त्या आपला मास्क विसरता आणि सीटवर बसतात. त्यानंतर जे काही झालं त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 20 फेब्रुवारी रोजी संसदेच्या अधिवेशनाला संबोधित करताना रॉयटर्स यांनी ट्वीटरद्वारे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. (Video Angela Merkel forgot to wear a mask after speech video viral)

खरंतर, कोरोनामुळे प्रत्येकाने मास्क वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशात मास्क विसरल्यामुळे अँजेला मर्केल घाबरल्या आणि त्या पटकन उठल्या आणि मास्क आणण्यासाठी गेल्या. या व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी आपल्या फाईलला टेबलवर ठेवलं बसल्या आणि मास्क नाही म्हटल्यावर अगदी डचकल्या.

यानंतर त्यांनी लगेच उठून टेबलवरचा मास्क घातला. रॉयटर्सच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर वापरकर्त्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. हा व्हीडिओ दहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे जगावर भीषण परिस्थिती ओढावली आहे. अनेक लोकांनी आपली नाती, माणसं गमावली. आर्थिक अडचणी आल्या. अनेकांचं संसार उद्धवस्त झाले. अशात कोरोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं असल्याचं या व्हीडिओतू दिसत. इतकंच नाही तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या जबाबदारीचं भान असणं महत्त्वाचं आहे. (Video Angela Merkel forgot to wear a mask after speech video viral)

संबंधित बातम्या – 

Mexico Plane Crash: एअर फोर्सचं विमान दुर्घटनाग्रस्त, 6 जणांचा मृ्त्यू, कारण अस्पष्ट

Nigeria Military Plane Crashed : नायजेरियात वायुसेनेच्या विमानाचा हवेत स्फोट, सात जणांचा मृत्यू

VIDEO: आकाशातच विमानाच्या इंजिनमध्ये स्फोट, 241 लोकांचा जीव टांगणीला, अंगाचा थरकाप उडवणारी दृष्ये

(Video Angela Merkel forgot to wear a mask after speech video viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.