AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mexico Plane Crash: एअर फोर्सचं विमान दुर्घटनाग्रस्त, 6 जणांचा मृ्त्यू, कारण अस्पष्ट

मेक्सिकोमधील वेराक्रूज राज्यात सैन्याचं विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेत 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. Mexico Plane Crash

Mexico Plane Crash: एअर फोर्सचं विमान दुर्घटनाग्रस्त, 6 जणांचा मृ्त्यू, कारण अस्पष्ट
मेक्सिकोत विमान अपघात
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 22, 2021 | 11:35 AM
Share

Mexico air force plane crashed : मेक्सिकोमधील वेराक्रूज राज्यात सैन्याचं विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेत 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोच्या संरक्षण मंत्र्यांनी रविवारी याविषयी माहिती दिली. रविवारी (21 फेब्रुवारी) ही घटना घडली. मेक्सिकोच्या हवाई दलाचे विमान लियरजेट 45 जालपा शहरातून उड्डाण करत होते. विमान दुर्घटनाग्रस्त होण्याचं कारण सांगण्यात आलेले नाही. (Mexico air force plane crashed six people died)

विमानाला आग लागल्यानं दुर्घटना, स्थानिक माध्यमांचा दावा

अपघातग्रस्त विमानात किती जण प्रवास करत होते त्याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून चौकशी सुरु आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमानानं उड्डाण केल्यानंतर विमानाल आग लागली आणि दूर्घटना झाली. रविवारी सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली. लियरजेट विमान जलापा शहराजवळील एमिलियाने जपाटा येथील एल लेंसेरो विमानतळावरुन उड्डाण घेत होते.

कॉकपिटची खिडकी तोडण्याचा प्रयत्न

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळाजवळील मैदानात धडक झाल्यानंतर कॉकपिट आणि मागील बाजू सोडून इतर भाग चक्काचूर झाला होता. मदतकार्य करणाऱ्या जवानांनी विमानाच्या कॉकपिटची खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला.

विमान दुर्घटनेबाबत वेगवेगळे दावे

मेक्सिकोचे संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 6 जवानांचा मृत्यू झालाय. तर, मृतांमध्ये पायलट आणि को-पायलट या दोघांचाही समावेश आहे. फ्लाइटअवेअरच्या माहितीनुसार विमान रविवारी मेक्सिकोतील जालपाला जाणार होते. मदतकार्य करणाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार बचावकार्य करणाऱ्यांनी विमान ताबास्को आणि विल्हेरमोसाला जात असल्याच मह्टलं होते.

अमेरिकेतील डेन विमानतळावरही अपघात

अमेरिकेतील (America) डेनवर आंतरराष्ट्रीय विमान तळावर (Denver International Airport) शनिवारी (20 फेब्रुवारी) रात्री उशिरा मोठा अपघात होता होता टळला. युनायटेड एअरलाईन्सच्या (United Airlines) एका विमानाला उड्डाणानंतर काही वेळेत आकाशातच आग लागली आणि विमानाचे भाग जमिनीवर कोसळायला लागले. त्यानंतर विमानावरील नियंत्रण सुटत विमान जमिनीच्या दिशेने कोसळू लागलं. मात्र, विमान चालकाच्या प्रसंगावधानाने विमानातील 241 प्रवाशांचा जीव वाचलाय

संबंधित बातम्या:

Kerala Plane Crash Photos: केरळमध्ये विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, 30 फूट खाडीत कोसळून दोन तुकडे

Karachi plane crash | पाकिस्तानात 100 प्रवाशांसह विमान इमारतीवर कोसळलं

9 दिवसांनंतर बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले

(Mexico air force plane crashed six people died)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...