
अॅमेझॉनच्या जंगलामध्ये महाकाय अॅनाकोंडा साप आढळतात. अनेकदा त्यांचे थरकाप उडवणारे व्हिडीओ देखील समोर येतात.कधी हिरव्या रंगाचा अॅनाकोंडा नदीवर तरंगताना दिसून येतो, तर कधी काळ्या रंगाचा अॅनाकोंडा दिसतो. अॅनाकोंडाला पाहाताच कोणाचाही थरकाप उडू शकतो, पायाखालची जमीन सरकते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मच्छिमाराला नदीत मासेमारी करताना एक विशाल अॅनाकोंडा दिसला, सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहाणाऱ्याच्या काळजाचा देखील थरकाप उडत आहे.
एक काळ्या रंगाचा विशालकाय अॅनाकोंडा पाण्यावर तरंगताना दिसून येत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये मच्छिमार नाही तर तो अॅनाकोंडा घाबरल्याचं पाहायला मिळत आहे. अॅनाकोंडा आपला जीव वाचवण्यासाठी या बोटीच्या पुढे पळत आहे. तर मच्छिमाराची बोट या अॅनाकोंडाचा पाठलाग करत आहे. अॅनाकोंडा प्रचंड वेगानं पुढे पळत आहे, या व्हिडीओमध्ये नंतर असं दिसून येत आहे की, या मच्छिमारानं अॅनाकोंडाचं शेपूट आपल्या हातात पक्क पकडलं आहे. त्यानंतर अॅनाकोंडा आणखीनच घाबरतो तो आपलं शेपूट या मच्छिमाराच्या हातातून सोडवण्यासाठी पूर्ण ताकत लावतो अॅनाकोंडाने पूर्ण ताकद लावण्यानंतर हा मच्छिमार अॅनाकोंडाचं शेपूट आपल्या हातातून सोडून देतो.
Fisherman finds huge anaconda 🐍 pic.twitter.com/xiK4IZrqpK
— Terrifying Nature (@JustTerrifying) March 10, 2023
मच्छिमाराच्या हातातून आपलं शेपूट सुटताच अॅनाकोंडा अधिक गतीनं नदीच्या किनाऱ्याकडे धावतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. एका युजरने म्हटलं आहे की, बरं झालं लवकर सोडलं नाहीतर आज तो वाचला नसता. तर एकानं म्हटलं आहे की, हा अॅनाकोंडा असा कसा आहे? जो एखाद्या माशा सारखा दिसत आहे. तर आणखी एकानं म्हटलं आहे की, मी हा व्हिडीओ पाहून प्रचंड घाबरलो, तर चौथ्या युजरने लिहिलं आहे की, अॅनाकोंडाला डिस्टर्ब करणं ही चुकीची गोष्ट आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.