VIDEO : पराभव जिव्हारी, चाहत्यांकडून स्टेडियमध्ये बॉम्ब हल्ला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

अॅथेन्स (ग्रीस) : सुपरलीग स्पर्धेत AEK Athens F.C. आणि AFC Ajax या दोन गटात वाद झाल्यामुळे AEK संघाच्या चाहत्यांनी थेट बॉम्ब हल्ला केला आहे. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या AFC Ajax संघाचे चाहते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्टेडियममध्ये एकच खळबळ उडाली होती. ही धक्कादायक घटना मंगळवारी ग्रीसमधील अॅथेन्स औलंपिक स्टेडिअममध्ये घडली असून या घटनेचा व्हिडीओ […]

VIDEO : पराभव जिव्हारी, चाहत्यांकडून स्टेडियमध्ये बॉम्ब हल्ला
Follow us on

अॅथेन्स (ग्रीस) : सुपरलीग स्पर्धेत AEK Athens F.C. आणि AFC Ajax या दोन गटात वाद झाल्यामुळे AEK संघाच्या चाहत्यांनी थेट बॉम्ब हल्ला केला आहे. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या AFC Ajax संघाचे चाहते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्टेडियममध्ये एकच खळबळ उडाली होती. ही धक्कादायक घटना मंगळवारी ग्रीसमधील अॅथेन्स औलंपिक स्टेडिअममध्ये घडली असून या घटनेचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मंगळवारी संध्याकाळी ग्रीसमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेत AEK Athens F.C. विरुद्ध AFC Ajax या ग्रुप ई च्या दोन संघात सामना सुरु होता. यावेळी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने दोन्ही संघाचे चाहते सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान AEK आणि Ajax मध्ये झालेल्या सामन्यात 2-0 अशा फरकाने Ajax संघाने विजय मिळविला. सामन्यात झालेला पराभव AEKच्या चाहत्यांना पचला नसल्यामुळे त्यांनी थेट पेट्रोल बॉम्ब Ajaxच्या चाहत्यांवर फेकून हल्ला केला. यावर पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसून अधिक तापास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.