रशियाकडून अमेरिकेवर काैतुकांचा वर्षाव, भारताबद्दल बोलणे टाळले, सख्खा मित्र बनला शत्रू? पुतिन म्हणाले…

डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात महत्वाची बैठक पार पडलीये. या बैठकीत काय होणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. भारतावर टॅरिफ लावण्यात आल्यानंतर पुतिन अमेरिकेच्या दाैऱ्यावर गेल्याने भारताला मोठी आशा होती. मात्र, आता वेगळेच विधान पुतिन यांनी केले.

रशियाकडून अमेरिकेवर काैतुकांचा वर्षाव, भारताबद्दल बोलणे टाळले, सख्खा मित्र बनला शत्रू? पुतिन म्हणाले...
vladimir putin and donald trump
| Updated on: Aug 17, 2025 | 8:33 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात 15 ऑगस्ट रोजी बैठक झाली. या बैठकीकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. युक्रेन बैठकीचा अजेंडा हा फक्त युक्रेन युद्ध असल्याचे सुरूवातीला सांगितले गेले. मात्र, प्रत्यक्षात या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियच्या अर्थव्यवस्थेत थेट परिणाम करण्यासाठी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणाच टॅरिफ लादलाय. हेच नाही तर भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याचे टॅरिफ लावण्यात आला. 27 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ सुरू होईल.

भारतावर टॅरिफ लावल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला. अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करावे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले नाहीये. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीनंतर पुतिन यांनी यावर भाष्य केले. त्यांनी थेट भेटीनंतर अमेरिकेचे काैतुक केले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले की, बरीच वर्ष इतके थेट बोलणे झाले नव्हते. आम्ही शांती आणि विस्तार वाढण्यासाठी संधी दिली आहे. आम्ही अमेरिकेच्या प्रशासनाच्या विचारांचा सन्मान करतो. ज्यामध्ये युद्ध लवकरच संपवण्याची गरज समजली जात आहे. आमचे पण हेच लक्ष आहे. आम्हाला पण हेच वाटत आहे की, सर्व मुद्दांवर शांततेत मार्ग निघावा. स्पष्ट, ठोस उपाय ही बैठक झाल्याचेही पुतिन यांनी म्हटले. भारताचा रशिया हा अत्यंत जुना आणि वेळोवेळी मदतीला धाव आलेला मित्र आहे.

रशियाकडून कच्चे तेल भारत खरेदी करत असल्यानेच अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला आहे. मात्र, आता पुतिन यांच्याकडून थेट अमेरिकेचे काैतुक केले जात आहे. मुळात म्हणजे अमेरिकेसोबत भारताने रशियामुळेच पंंगा घेतला आहे आणि पुतिन अमेरिकेचे काैतुक करताना दिसत आहेत. आता पुढील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडींना वेग येणार असल्याचे स्पष्ट आहे.