AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफचा पहिला झटका, भारताला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठा धक्का, कोट्यवधीचे नुकसान, अमेरिकेची टीम…

टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेलेले असतानाच आता अमेरिकेकडून भारताला अत्यंत मोठा झटका देण्यात आलाय. पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतावरील टॅरिफचे संकट टळले जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाहीये.

टॅरिफचा पहिला झटका, भारताला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठा धक्का, कोट्यवधीचे नुकसान, अमेरिकेची टीम...
| Updated on: Aug 17, 2025 | 8:05 AM
Share

अनेक वर्षांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहिले आहेत. मात्र, टॅरिफच्या प्रश्नावरून हे संबंध ताणले गेले असल्याचे बघायला मिळतंय. टॅरिफवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ हा लावण्यात आला आहे. टॅरिफचा मुद्दा पेटलेला असतानाच आता एक अत्यंत मोठी अशी बातमी पुढे येताना दिसत आहे. अमेरिकी ट्रेड टीम ही भारताच्या दाैऱ्यावर येणारी होती, त्यांचा नियोजित दाैरा होता. मात्र, त्यांनी आता अचानक त्यांचा हा दाैरा रद्द केलाय.

प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चेचा सहावा टप्पा अमेरिकेने पुढे ढकलल्याने भारताला मोठा धक्का बसला. अमेरिकेची ट्रेड टीम भारतात येऊन काही मुद्दावर चर्चा करणार होती आणि काही महत्वाचे करार देखील होणार होते. मात्र, आता तो दाैरा पुढे ढकलण्यात आलाय. ही बैठक दिल्लीमध्ये 25  ते 29 ऑगस्टपर्यंत चालणार होती. एका अमेरिकी अधिकाऱ्याने या बैठकीबद्दल बोलताना म्हटले की, आम्ही आमचा भारताचा नियोजित दाैरा पुढे ढकलत आहोत. मात्र, आता ही बैठक पुढे कधी होणार हे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले नाहीये.

आतापर्यंत भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत पाच बैठका झाल्या आहेत. ही सहावी महत्वाची बैठक होती. मात्र, सध्याच्या टॅरिफच्या वादावरून ही बैठक रद्द करण्यात आलीये. ही बैठक रद्द झाल्याने हा भारताला अत्यंत मोठा झटका म्हणावा लागेल. ही बैठक भारतासाठी अत्यंत महत्वाची होती, कारण 27 ऑगस्टपासू भारतावर 50 टक्के टॅरिफ लागणार आहे. ही बैठक झाली असतील तर काही महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घेतले जाऊ शकले असते. मात्र, आता ही बैठक अमेरिकेकडून रद्द करण्यात आलीये. अमेरिकेकडून अजून पुढची तारीख जाहीर करण्यात आली नाहीये.

अमेरिकेला भारतातील कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रात अधिक व्यापार करायचा आहे. मात्र, अमेरिकेला भारताकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, भारत हा त्यांच्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर निर्णय घेईल. मुळात म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जर अमेरिकी कंपन्या या भारतीय बाजारपेठेत कृषी संबंधित गोष्टींमध्ये व्यापार करत असतील तर हा भारतीय शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे भारतालाचे म्हणणे आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा