AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Pradhan : दिल्ली पोलीस हाय अलर्टवर, धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद

Dharmendra Pradhan : काल रात्री जंतर-मंतर परिसरात झालेल्या राड्यामुळे वातावरणात तणाव आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांनी रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांवर दगडफेक केली.

Dharmendra Pradhan : दिल्ली पोलीस हाय अलर्टवर, धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद
Dharmendra Pradhan
| Updated on: Jul 23, 2026 | 9:14 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे दिल्लीतील वातावरण चांगलचं तापलं आहे. आज सीजेपीच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. सोमवारी या आंदोलकांनी दिल्लीत संसद भवनावर मार्च काढला होता. हे आंदोलक संसद भवनाच्या जवळ पोहोचले होते. पण त्यांना संसदेपासून 150 मीटर अंतरावर रोखण्यात आलं. यावेळी मोठा राडा झाला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झडपा झाल्या. त्यात विद्यार्थी आणि पोलीस जखमी झाले.

काल रात्री जंतर-मंतर परिसरात झालेल्या राड्यामुळे वातावरणात तणाव आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांनी रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांवर दगडफेक केली. यात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर सुरक्षा बंदोबस्त वाढवला आहे. प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. दिल्ली पोलीस हाय-अलर्टवर आहेत.

इन्स्टाग्राम खाते बंद

एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच अचानक धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधान यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यांनी परदेशात कायद्याचे शिक्षण घेतल्याने त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. याच ट्रोलिंगमुळे आता निमिषा प्रधान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने आपले इन्स्टाग्राम खाते बंद केले आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबालाही लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी खबरदारी म्हणून काही पावलं उचलली आहेत. सीजेपीच्या आंदोलनामुळे आजही दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी घेतेय कायद्याचे शिक्षण 

धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधान या मॅसाचुसेट्स येथे कायद्याचे शिक्षण घेत आहेत. 2023 सालापासून त्या अमेरिकेतच आहे. निमिषा सध्या सध्या यूएस इंडिया स्टेटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये सिनिअर असोसिएट म्हणून काम करत आहेत

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच