AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण

Sunetra Pawar: बारामतीत अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार धावल्या. त्यांच्या संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण यावेळी बारामतीकरांना झाली. त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार... बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण
सुनेत्रा पवार
| Updated on: Jul 23, 2026 | 9:11 AM
Share

Sunetra Pawar: बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रस्त्यात अपघातग्रस्त तरुणीला पाहताच ताफा थांबवला. त्यांनी तरुणीची विचारपूस करून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपचारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्वीय सहाय्यकांनाही रुग्णालयात पाठवले. सुनेत्रावहिनी पवार यांच्या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

पवारांचा वारसा जपल्याची भावना

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीत विकास कामांची पाहणी करण्यासाठी चालल्या होत्या. जळोची एमआयडीसी रस्त्यावर एका विद्यार्थिनीला टेम्पोने धडक दिली. ती वाहनासह खाली पडली. ती जखमी झाली होती. सुनेत्रा पवार यांचा ताफा त्यावेळी तिथून चालला होता. हे दृश्य पाहताच त्यांनी गाडी थांबवली. उतरून त्या मुलीची चौकशी केली. त्यांनी स्वतः गाडीची व्यवस्था करून स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांना सोबत पाठवले. त्या मुलीच्या उपचारांची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थितांना दिवंगत अजित पवार यांच्या कार्यशैलीची आठवण झाली. दादांची संवेदनशीलता आणि त्यांचा वसा सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याचे कौतुक नागरिकांनी केले. सुनेत्रा पवार या सुद्धा दादांच्याच पावलांवर पाऊल टाकत असल्याचे कौतुक नागरिकांनी केली.

पवार कुटुंबिय गोजुबावी येथील धावपट्टीजवळ

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळांचे दर्शन घेतले. त्यानंतर पवार कुटुंबिय अजितदादांचे विमान जिथे कोसळले, त्या गोजुबावी गावातील धावपट्टीजवळ पोहचले. तिथे त्यांनी फुलं वाहत आदरांजली वाहिली. यावेळी वातावरण अत्यंत भावूक झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत येत असताना 28 जानेवारी 2026 रोजी दादांचे विमान येथेच कोसळले होते. त्यानंतर मोठा स्फोट झाला होता. या विमान अपघातात वैमानिक, केबिन क्रू आणि दादांसह त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांच्यासह इतर नेते करत आहेत. पण अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट

अजितदादांच्या जयंतीनिमित्त काल सुनेत्र पवार यांनी भावूक पोस्ट लिहिली. “दादा… इतकी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर, कुटुंब आनंदात असायचं. शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन अजिबात तयार होत नाही दादा…” अशा आशयाची पोस्ट त्यांनी काल लिहिली होती.

Follow Us
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट