AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia-Ukraine War : ट्रम्प यांच्यासोबत सिक्रेट टॉक का? तह करण्याआधी पुतिन यांची मोठी चाल, जगाच्या नकाशावरुन…

Russia-Ukraine War : येत्या 20 जानेवारील डोनाल्ड ट्रम्प ओवल ऑफिसची जबाबदारी संभाळणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवर बोलणं झाल्याची चर्चा आहे. स्ट्रॅटर्जीमध्ये मास्टर असलेल्या पुतिन यांनी त्याआधी मोठी चाल खेळली आहे. तह करण्याआधी पुतिन यांना काय साध्य करायचं आहे?.

Russia-Ukraine War : ट्रम्प यांच्यासोबत सिक्रेट टॉक का? तह करण्याआधी पुतिन यांची मोठी चाल, जगाच्या नकाशावरुन...
vladimir putin-donald trump
| Updated on: Nov 12, 2024 | 11:56 AM
Share

रशिया-युक्रेन युद्ध सुरु असताना अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा झाल्याच बोललं जातय. दोघांमध्ये युद्धविरामाचा फॉर्म्युला ठरला असल्याचही सांगितलं जातय. रशियाने अशी कुठलीही चर्चा झाल्याच्या वृत्ताच खंडन केलं आहे. ही बातमी बाहेर येताच राष्ट्रपती पुतिन यांनी बॅटल ऑफ डोनेस्कला अजून गती दिलीय. पूर्व युक्रेनच्या काही शहरांवरील हल्ल्याचा वेग वाढवला आहे. पुतिन यांनी कुठलाही सामंजस्य करार करण्याआधी युक्रेन विरुद्ध एक रणनिती बनवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर युरोपातील देश आणि डेमोक्रॅट्स एक शक्यता वर्तवली होत, ती आता खरी होणार असं दिसू लागलय. रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या डोनेस्क प्रांत ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याने चाल केली आहे. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा ज्यूनियर ट्रम्पने इन्स्टाग्रामवर एक मीम पोस्ट करुन जेलेंस्की यांची खिल्ली उडवली आहे.

मीममध्ये ट्रम्प यांच्यासोबत जेलेंस्की दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसते. त्यानंतर जेलेंस्कीच्या डोक्यावर डॉलर बरसण्यास सुरुवात होते. ज्यूनियर ट्रम्पने मीमच्या कॅप्शनमध्ये लिहिलय POV म्हजे पॉइंट ऑफ व्यू. डॉलरचा भत्ता बंद व्हायला अजून 38 दिवस बाकी आहेत. 20 जानेवारील डोनाल्ड ट्रम्प ओवल ऑफिसची जबाबदारी संभाळणार आहेत. त्यानंतर युक्रेनला अमेरिकेकडून मिळणारी लाखो, कोट्यवधी डॉलरची मदत बंद होऊ शकते. युद्धात युक्रेन एकटा पडू शकतो.

लोकांचा अंडरग्राउंड रेल्वे स्टेशनमध्ये आसरा

10 नोव्हेंबरला ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाल्याच वृत्त आहे. ट्रम्प आणि पुतिन यांच्यात युद्धावर तोडगा काढण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. रशियन सैन्याने कुरोखोवोमध्ये FAB-1500 बॉम्बने हल्ला केला. त्याशिवाय रशियाच्या 8 Tu-95 बॉम्बर्सनी युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाइल आणि बॉम्बने हल्ले केले. रशिय सैन्याने पुन्हा एकदा ओडेसावर मोठा हल्ला केला. रशियाच्या MiG 31 स्क्वाड्रनने सुद्धा युक्रेनी शहरांवर हवाई हल्ले केले. कीवमध्ये हल्ल्याच्या भितीने लोकांनी अंडरग्राउंड रेल्वे स्टेशनमध्ये आसरा घेतला.

कुराखोवोला तिन्ही बाजूंनी घेरलय

रशियन सैन्याने कुराखोवोला तिन्ही बाजूंनी घेरलय. कुराखोवो डोनेस्कमध्ये आहे. कुराखोवोपासून रशियन सैन्य 3 किलोमीटर दूर आहे. कुराखोवोवर आर्टिलरी, मोर्टार आणि ड्रोनने हल्ले सुरु आहेत. कुराखोवोमध्ये 700 ते 1000 लोक उरले आहेत. बाकीचे लोक शहर सोडून गेले आहेत. उरलेले लोक बेसमेंटमध्ये दिवस काढत आहेत. नागरी सुविधा नष्ट झाल्या आहेत.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.